शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमध्ये वाढतोय धोका, फुफ्फुसांचे आरोग्य जपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांसह तरुणांमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तसेच मृतांमध्ये ३० वर्षाआतील तरुणांचाही समावेश असल्याने ...

वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांसह तरुणांमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. तसेच मृतांमध्ये ३० वर्षाआतील तरुणांचाही समावेश असल्याने तरुणांमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे तरुणांनी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्यासाठी तसेच निरोगी फुफ्फुसांसाठी योग्य व्यायाम करावे, मद्यपान, धुम्रपान टाळावे असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जात आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या अन् मृत्यूदर हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरत आहे. परंतु, अशा परिस्थितीत घाबरण्यापेक्षा खबरदारी म्हणून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या फुफ्फुसाची निगा राखणे, तसेच फुफ्फुसांची क्षमता वाढविण्याची गरज आहे. फुफ्फुस हा आपल्या शरीरातील महत्त्वाचे अंग असून, वातावरणातून ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बनडाय ऑक्साईड बाहेर सोडणे हे फुफ्फुसाचे महत्त्वाचे कार्य आहे. या माध्यमातूनच ऑक्सिजन रक्ताद्वारे हृदयापर्यंत पोहोचतो. मात्र, कोरोना विषाणू थेट याच फुफ्फुसांवर अटॅक करत असल्याने न्युमोनिया होतो. परिणामी ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो; मात्र फुफ्फुसांची क्षमता कमी असल्याने त्याला एकाच वेळी शंभर टक्के ऑक्सिजन स्वीकारणे शक्य नसते. त्यामुळे अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो. ही परिस्थिती आपल्यावर ओढवू नये म्हणून नागरिकांनी, विशेषत: कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी फुफ्फुसाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष, धुम्रपान व मद्यपान यामुळे फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो.

......

कोरोनाचा दोन प्रकारे हल्ला

अप्पर रिस्पेरेक्टर

बहुतांश रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा हल्ला हा अप्पर रिस्पेरेक्टर म्हणजेच घशापर्यंतच झालेला असतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असतात. अशा रुग्णांच्या फुफ्फुसापर्यंत कोरोना विषाणू पोहोचत नसल्याने त्यांना जास्त धोका नसतो.

......

लोअर रिस्पेरेक्टर

प्रामुख्याने ५० वर्षावरील व्यक्ती किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे,अशा व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लोअर रिस्पेरेक्टर म्हणजेच फुफ्फुसांपर्यंत झालेला असतो. त्यामुळे फुफ्फुसाच्या ल्युकस लेअरला बाधा होऊन न्युमोनिया तयार होतो. न्युमोनियाचे प्रमाण वाढल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. ८० टक्के लोकांचा न्युमोनिया बरा होत असला, तरी फुफ्फुसाची लवचिकता कमी होते. परिणामी ऑक्सिजन शोषण्याची क्षमता कमी होते.

.............................

अशी राखा फुफ्फुसांची निगा

मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक

सायकलिंग

जोरोने श्वास घेणे

काही सेकंद श्वास रोखून ठेवणे

छातीच्या मसल्सचे हलके व्यायाम

शक्य असल्यास धावणे

प्राणायम करणे

खानपानावर द्या लक्ष

.............

युवकांचा व्यायामाकडे असलेला कल कमी होत चालला आहे. गुटखा, धूम्रपानासह अ‍ॅसिडिटीमुळे फुफ्फुसातील म्युकस लेअर खराब होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे दम लागणे, कफ होणे, खोकला, अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे धूम्रपान टाळलेलेच बरे. शिवाय आहारामध्ये अ‍ॅन्टी ऑक्सिडंट घटक असलेल्या भाजीपाला, फळांचे सेवन करावे. कोरोनातून बरे झालेल्यांसह प्रत्येकाने फुफ्फुसाला निरोगी ठेवण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायामाला प्राधान्य द्यावे.

- डॉ. प्रवीण ठाकरे, छाती रोग तज्ज्ञ, वाशिम.