शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा बायपासवर अपघातांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

गतिरोधक व ट्राफिक सिग्नल बसविण्याची मागणी.

कारंजा लाड (वाशिम) : गतिरोधक व ट्राफिक सिग्नल नसल्याने येथील बायपासवरील वाहतूक व्यवस्था बेलगाम झाली असून, अपघातप्रवण स्थळ म्हणून नवी ओळख ह्यबायपासह्णला मिळत आहे. शहराच्या विस्तारीकरणामुळे बायपास परिसरात असंख्य वस्त्या निर्माण झाल्या आहेत. पण, शाळा, महाविद्यालय आणि मुख्य बाजारपेठ गावातच असल्यामुळे बायपास परिसरातील नागरिकांना दररोज या ना त्या कारणामुळे गावात जाण्यासाठी बायपास चौकातूनच आवागमन करावे लागते. याशिवाय बायपास चौकातून अकोला, अमरावती, मंगरुळ पीर, वाशिम, मानोरा, दारव्हा, यवतमाळ व कारंजा शहराकडे रस्ते जातात. त्यामुळे बायपासवरील राणी झाँशी चौकात सकाळी सातपासून रात्री ११ पर्यंत वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. बायपासवर दोन चौक असून, दोन्ही चौकाच्या मार्गावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. परिणामी येथून वाहनांची प्रचंड वेगाने आवागमन होते. बायपासवरून ट्रक, एस.टी. बस, कार, ऑटोरिक्षा, मोटारसायकल अशा वाहनांची नेहमीच रेलचेल असते. बायपासवरून शेलूबाजार, पिंजर, दारव्हा, यवतमाळ या गावासह अनेक ग्रामीण भागात जाण्याकरिता बस व ऑटोरिक्षा मिळतात. वाहन मिळविण्याकरिता नागरिक या चौकात उभे राहतात तसेच वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.बायपासवरून मोठय़ा शहराकडे जाणार्‍या सर्व रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने डांबरीकरण करण्यात आले. परंतु, रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. रस्ते चांगले झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. बाय पासवरील चौकात वाहनधारकांना विरुद्ध दिशेने येणारे वाहन कोणत्या दिशेने पुढे जाणार आहे, याचा अंदाज घेणेही येथे कठीण जाते. त्यामुळे अनेक वाहनांची येथे समोरासमोर धडक झाली आहे.