राजगाव (वाशिम) : येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रावरुन वीजेची होणारी मागणी व पुरवठय़ातील असमतोल पाहता वीज उपकेंद्राची क्षमता वाढवून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. स्थानिक वीज वितरण कंपनीचे ३३ केव्ही सबस्टेशन १९६0 साली कार्यान्वित झाले होते. त्याकाळात विजेची मागणी गृहीत करुन त्या क्षमतेचे रोहित्र आजपर्यंंंत कायम कार्य करीत असून आज रोजी त्या काळच्या वीज ग्राहक मागणी प्रमाणे १0 पट मागणीत वाढ झाली. तरी स्थानिक विज वितरण रोहित्राची क्षमता पूर्वीचीच असल्यामुळे त्या सबस्टेशन अंतर्गत गावांना मागणी आणि पुरवठयाच्या असमतोलाच्या विज पुरवठयाचा सामना करावा लागत आहे. परिणामी घरगुती विज वापर व कृषी विज वापर, उद्योगीक विज वापर, प्रभावित होत आहे. ही आजची परिस्थितीची जाणीव मराविविक ने समजून घ्यावी व राजगाव येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे जागी ६६ केव्ही वीज वितरण क्षमतेचे रोहित्र बसवून विज पुरवठा करावा अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी विज वितरणचे अधीक्षक अभियंता वाघमारे यांना निवेदनाव्दारे केली. यासंदर्भात आपण जातीने लक्ष घालून न्यायोचित भूमिका घेवू असे आश्वासन अधीक्षक अभियंता यांनी ग्रामस्थांना दिले.
राजगावच्या वीज उपकेंद्राची क्षमता वाढवा
By admin | Updated: November 23, 2014 00:11 IST