बुलडाणा : दिवसेंदिवस पशुधनाची होणारी कत्तल यांची कारणे, दुधाळ जनावरेकशी ओळखावी, जनावरांच्या देशी व विदेशी जाती, दुग्ध व्यवसाय कसा करावा याबाबींचा विचार करुन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनिल पसरटे व डॉ.संदीपराठोड. जि.प.बुलडाणा, प.वि.अ.डॉ.दत्तात्रय मोरे व डॉ.पवार यांच्यामार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय दवाखाना एकलारा येथील संस्थाप्रमुख डॉ.किरणसोनुने यांच्यामार्फत शेतकरी वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.याकरिता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनाचेऔचित्य साधून पशु वैद्यकीय दवाखाना एकलारा येथे शेतकरी वाचनालय सुरुकरण्यात आले. ह्या वाचनालयाचे उद्घाटन पं.स.माजी सभापती तथा विद्यमानपं.सदस्य मा.लक्ष्मणराव अंभोरे यांचे हस्ते तथा एकलारा ग्रा.पं.चे सरपंच.रेणुकाताई पवार ह्यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ह्या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती असल्याने एकलारा येथीलप्रतिष्ठित युवा नेते प्रकाश पाटील अंभोरे यांनी १२६ पुस्तकांचा संच भेटम्हणून दिला. त्याबद्दल त्यांचा पशु वैद्यकीय दवाखान्याचे संस्थाप्रमुखडॉ.किरण सोनुने ह्यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवकपी.जी.जाधव ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अनिल साळवे ह्यांनी केले.सदर कार्यक्रमास भरोसा येथील पशु वैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीयअधिकारी डॉ.दिनेश पवार, गणेश वायाळ, हरी घेवंदे, ग्रा.पं.सदस्य,ग्रामसेवा सहकारी संस्थेचे संचालक, प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्तीचेअध्यक्ष भोरसा भोरशी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)
पशूवैद्यकीय दवाखान्यात शेतकरी वाचनालयाचे उद्घाटन
By admin | Updated: April 16, 2017 13:37 IST