कारंजालाड : विद्यार्थ्यात शैक्षणिक व सामाजिक मूल्यांची रूजवण करणार्या येथील जिनवरसा चवरे हायस्कूलने ह्यनो व्हेईकल डेह्ण हा अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला असून, या उपक्रमाला पहिल्या दिवशी विद्यार्थी तथा शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. धार्मिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असलेल्या कारंजा शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबत दिवसागणिक वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. परिणामी शहरात वायू व ध्वनि प्रदुषण वाढले आहे. या प्रदुषणामुळे फुफ्फुस, अंधत्व यासह इतर आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. आठवड्यातील गुरूवार हा ह्यनो व्हेईकल डेह्ण म्हणून राबविण्याचा संकल्प सोडला आहे. या दिवशी हायस्कूलमधील विद्यार्थी, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी कोणतेही वाहन न वापरता शाळेत येतील, अशा प्रकारच्या सूचना त्यांना करण्यात आल्या आहेत. वर्ग ५ ते १२ वी पर्यंतचे एकूण ९00 विद्यार्थी तर ६0 शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. शाळेपासून दूर अंतरावर राहणारे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचार्यांना या उपक्रमापासून शिथीलता देण्यात आली आहे. पेट्रोलची बचत करणे, हा देखील उपक्रमामागील उद्देश आहे. शाळेत येण्यासाठी दररोज मोटारसायकलचा वापर करणारे विद्यार्थी या उपक्रमामुळे गुरूवारी पायदळ किंवा सायकल घेवून विद्यालयात येतात, हे विशेष.
‘नो व्हेईकल डे’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: August 9, 2014 01:15 IST