शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:01 IST

वाशिम: निती आयोगाने सुचविलेले वैद्यकीय व्यवसायविषयक  धोरण राज्याच्या आरोग्यविषयक गरजांशी विसंगत असून यामुळे  संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते. त्यामुळे आयोगाच्या  ‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करावी, अशी मागणी  नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनशी (निमा) संलग्नित  डॉक्टरांनी केली. यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा  करून त्यांच्यामार्फत थेट पंतप्रधानांकडे निवेदन पाठविले.

ठळक मुद्दे‘नीमा’ संघटना जिल्ह्यातील डॉक्टरांची जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निती आयोगाने सुचविलेले वैद्यकीय व्यवसायविषयक  धोरण राज्याच्या आरोग्यविषयक गरजांशी विसंगत असून यामुळे  संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडू शकते. त्यामुळे आयोगाच्या  ‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करावी, अशी मागणी  नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनशी (निमा) संलग्नित  डॉक्टरांनी केली. यासंदर्भात संघटनेने जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा  करून त्यांच्यामार्फत थेट पंतप्रधानांकडे निवेदन पाठविले.संघटनेच्या म्हणण्यानुसार, ‘निमा’ ही आयुर्वेद, युनानी व सिद्ध  या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांची देशव्यापी  संघटना असून देशभरात संघटनेच्या हजारपेक्षा जास्त शाखा  कार्यरत आहेत. ‘निमा’चे डॉक्टर वाडी, वस्ती, झोपड्या, तांडे,  दुर्गम प्रदेश, आदिवासी क्षेत्र, ग्रामीण व शहरी विभाग, दुष्काळी  प्रदेश याठिकाणी पोहचून गरीब व गरजू रुग्णांना अत्यंत नाममात्र  दरात तथा फलदायी वैद्यकीय सेवा सुविधा पुरवत आहेत. ही  बाब लक्षात घेवून विधेयकात सुधारणा होणे गरजेचे आहे, असे  निवेदनात नमूद करून भारतीय उपचार पद्धतीला राष्ट्रीय उपचार  पद्धती म्हणून घोषीत करावे, ‘एनसीआयएसएम’ विधेयकात  समन्वयात्मक उपचार पद्धती असावी, आयुर्वेदिक औषधीला  जीएसटीतून वगळावे, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांंना  एमबीबीएसप्रमाणे विद्यावेतन द्यावे, आदी मागण्यांचाही निवेदना त समावेश आहे. दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना संघटनेचे डॉ.सुधाकर  जिरोणकर, अध्यक्ष डॉ. अजय राठोड, सचिव डॉ. सागर  आंबेकर, डॉ. आनंद कंदोई, डॉ. मनीष खपली, डॉ. दिलीप  लाहोटी, डॉ. अमोल नरवाडे, डॉ. करूणा अंभोरे (नरवाडे),  डॉ. जागृती आंबेकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.-विष प्राशन करून वृद्धेची आत्महत्या!लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: तालुक्यातील मारसूळ येथील ८0 वर्षीय वृद्ध महिलेने  विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ६ ऑ क्टोबर रोजी उघडकीस आली. याबाबत वासुदेव अनंतराव भेंडेकर यांनी मालेगाव पोलिसात  फिर्याद दिली की ,  सुभद्राबाई तुकाराम भेंडेकर यांनी त्यांची  देखभाल करणारे कुणीही नसल्याने विषारी द्रव्य प्राशन करून  आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड  कॉन्स्टेबल पांडुरंग राठोड करीत आहेत.