शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

चिमुकल्यांनी रांगोळीतून पटविले वन्य जीवांचे महत्त्व! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:50 IST

मंगरुळपीर: मानद वन्य जीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या संकल्पनेतून वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेत सहभागी होत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशा रांगोळी रेखाटून वन्य जीवांचे महत्त्व पटवून देण्याची किमया साधली.

ठळक मुद्देमंगरुळपीर येथे आयोजनवन्य सप्ताहानिमित्त स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: मानद वन्य जीव रक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या संकल्पनेतून वन्यजीव सप्ताहांतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेत सहभागी होत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशा रांगोळी रेखाटून वन्य जीवांचे महत्त्व पटवून देण्याची किमया साधली. मंगरुळपीर येथे ७ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंगरुळपीर येथील सांस्कृतिक भवनात ४ ऑक्टोबरपासून वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत लोकांना पर्यावरण आणि वन्य प्राण्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या विषयाशी निगडीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वन्य जीव या विषयावर शनिवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये तालुक्यातील विविध शाळांतील ५0 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित वन्य जीवांचे चित्रण करून त्यांचे महत्त्व आणि आकर्षकता पटवून देण्याची कामगिरी केली. स्पर्धेचे निरीक्षक प्रसिद्ध चित्रकार प्रशांत कर्‍हे आणि लायनेस क्लबच्या अध्यक्ष चंचल खिराडे यांनी केले. या स्पर्धेचे आयोजन मानद वन्य जीव रक्षक गौरवकुमार इंगळे आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनंत गीते व मंगरुळपीर वन विभागाच्यावतीने करण्यात आले. या स्पर्धेत सृष्टी शंकर भगत हिने प्रथम, शामल विष्णू भगत हिने द्वितीय, तर स्नेहल प्रताप पडघान हिने तृतिय क्रमांक पटकावला. त्याशिवाय प्रतिभा सरकटे हिला प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या सप्ताहात ६ सप्टेंबर रोजी ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेचे निरीक्षण प्रा. अरुण इंगळे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. दादाराव पाथ्रीकर, मानवहक्क चळवळीचे सचिन कुळकर्णी यांनी काम पाहिले. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी अतिश सुंदर शब्दांत पर्यावरणाविषयी आपले विचार व्यक्त केले.