शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चवदाव्या वित्त आयोगामुळे आले सरपंचपदाला महत्व

By admin | Updated: August 12, 2015 00:36 IST

निधीसाठी लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा; पद मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू.

वाशिम : १४ व्या वित्त आयोगाचा १00 टक्के निधी आता थेट जिल्हा परिषदांकडून ग्राम पंचायतींना मिळणार असल्याने नुकत्याच झालेल्या १६३ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचे महत्व वधारले आहे. त्यातल्या त्यात अल्पावधीतच सरपंच पदाची निवडणुक होत असल्याने केंद्र व राज्याकडून मिळणार्‍या या निधीच्या लाभासाठी सरपंच पदावर दावे प्रती दावे सुरु झाल्याने ही निवडणुक जिल्हयात रंगतदार होण्याचे सकेत मिळाले आहेत. जिल्हयात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मुदत संपणार्‍या ४ ऑगस्ट रोजी निवडणुक झाली होती. आता सरपंच पदाच्या निवडीचे वेध १६३ ग्राम पंचायतीमध्ये लागले आहेत. जिल्हयातील बहुतांश ग्राम पंचायत समितीची मुदत ही २५ ऑगस्ट आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवडयात संपत आहे. त्या अनुषंगाने मुदत संपण्याच्या पुर्व संध्येलाच सरपंच पदाची निवडणुक घेण्याचा जिल्हा निवडणुक विभागाचा मनोदय आहे. दुसरीकडे चवदाव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हयातील ४९३ ग्राम पंचायतींना १३ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. मात्र अद्याप तो सरपंच आणि ग्रामसेवकाच्या संयुक्त खात्यात वर्ग करण्यात आलेला नाही. १६३ ग्राम पंचायतीच्या सरपंच निवडी नंतर हा निधी जिल्हयातील ग्राम पंचायतीला मिळणे अभिप्रेत आहे. निवडणुक झालेल्या ग्राम पंचायतीपैकी निम्या ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतील सरपंच ग्राम पंचायतीवर विराजमान व्हावा या साठी राजकारण्यांकडून सद्या फिल्डीग लावल्या जात आहे. सोबतच त्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. चवदाव्या वित्त आयोगाची मार्गदर्शक तत्वे अद्याप प्राप्त झाली नसली तरी पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायतीला निधी खर्चा बाबत आता अर्मयाद अधिकार मिळणार असल्यामुळे पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तरावरील महत्वाचे सरपंच पद आता चांगलेच प्रकाश झोतात आले आहे. त्यामुळेच या पदावर आपल्या जवळील व्यक्ती बसावी यासाठी जिल्हयातील दिग्गज राजकारणी प्रयत्नात आहेत.