शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्राम विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अमरावती महसूल विभागाचे आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. जिल्हा परिषद येथे २७ जुलै रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ...

ठळक मुद्देविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अमरावती महसूल विभागाचे आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्राम विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अमरावती महसूल विभागाचे आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. जिल्हा परिषद येथे २७ जुलै रोजी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपायुक्त झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी माया केदार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.विभागीय आयुक्त म्हणाले की, ग्रामीण जीवनन्नोती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना घरांचा लाभ लवकरात लवकर दोण्याचा प्रयत्न करावा. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेविषयी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात यावी. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या जास्तीत जास्त महिला बचत गटांना व्यवसायासाठी बँकेकडून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात यावा. त्यामुळे या बचत गटांना उत्पन्नाचे साधन निर्माण होण्यास मदत होईल.स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्याचे काम चांगले असून, संपूर्ण जिल्हा लवकरात लवकर हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्या. रोजगार हमी योजना, सर्व शिक्षा अभियान, अंत्योदय योजना, राजमाता जिजाऊ बाल आरोग्य व पोषण मिशन आदी योजनांचाही विभागीय आयुक्तांनी यावेळी आढावा घेतला.