वाशिम : राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी करण्यात आली असून, गाई, वळू व बैल यांच्या कत्तलीस मनाई आहे. या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. बी. सोनावणे यांच्यासह पोलीस प्रशासन, परिवहन विभागाचे अधिकारी तसेच मंगरुळपीर, कारंजा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. २५ सप्टेंबर २0१५ रोजी बकरी ईद हा सण साजरा होत आहे. यावेळी मोठय़ा प्रमाणात जनावरांची कुर्बानी देण्यात येते. गोवंश हत्याबंदी असल्यामुळे जिल्ह्यात गाई, वळू व बैल यांची कुर्बानी दिली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषत: पोलीस व परिवहन विभागाने सतर्क राहून गोवंशाची कुर्बानीसाठी वाहतूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, बकरी ईदनिमित्त गाई, वळू व बैल आदी गोवंशाची हत्या न करता शासन निणर्याचे पालन करावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी बैठकीत उपस्थितांना दिले.
गोवंश हत्याबंदीची अंमलबजावणी करा
By admin | Updated: September 24, 2015 01:18 IST