शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रिठद परिसरात अवैध वृक्षतोड

By admin | Updated: October 29, 2014 01:25 IST

वनतस्करांनी परत एकदा सक्रिय.

रिठद (वाशिम): रिठद परिसरात वनतस्करांनी परत एकदा सक्रिय होत वनसंपदेवर कुर्‍हाडीचे घाव घालणे सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यालगतच्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या जात असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यावरणाचा समतोलपणा कायम राखण्यासाठी राज्यात सर्वत्रच वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला जात आहे. यासाठी राज्य शासन लाखो रुपयांची तरतूद करीत आहे. तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या शासकीय व इतर प्रकारच्या वृक्षांवरच वनतस्करांकडून कुर्‍हाड चालविली जात आहे. रिठद परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शासकीय वृक्षांची अवैध कत्तल केली जात असल्याचे चित्र आहे. वृक्षांची कत्तल करताना नवीन शक्कल वनतस्करांकडून लढविली जात आहे. वृक्षाची साल काढून वाळविणे, वृक्षाच्या बुंध्याजवळ आग लावणे तर कधी-कधी रात्रीच्या वेळी अख्ख्या वृक्षावरच कुर्‍हाड चालवून त्याची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. रिठद परिसरातील शासकीय वृक्षांना कुणी वाली राहिला नसल्याची बाब समोर येत आहे. या परिसरात वनतस्कर नेहमीच सक्रिय असतात. सात-आठ महिन्यातून एक-दोन धुमाकूळ घालत उभ्या झाडांना जमीनदोस्त केले जाते. आता परत एकदा या परिसरात वृक्षांची तस्करी करणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येते. वृक्षांवर कुर्‍हाड चालविली जात असल्याने या परिसरातील वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येते.