मंगरूळपीर (वाशिम ) : वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे तालुक्यातील अनेक भागात सर्रास अवैध वृक्षतोड करण्यात येतत असून, वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर मोठय़ा प्रमाणात वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या महत्त्वपूर्ण बाबीकडे वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी सुज्ञ जनतेकडून केली जात आहे.अलीकडच्या काळात दिवसेंदिवस झपाट्याने लोकसंख्येत वाढ होत असून, ग्रामीण भागातील अनेकांचा कल हा शहरीकरणाकडे वाढला आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरणाच्या जंगलात मोठी वाढ होत आहे. तसेच अनेक जण वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी रॉकेलमि२िँं१्रूँं१त पेट्रोलचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णत: बिघडत आहे. परिणामी ऋतुमानात बदल होऊन पर्जन्यमान कमी होत असल्याचे दिसून येते, ही महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेऊन शासनाने तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, अशी सक्ती करण्यात आली आहे. जे नियमाचे उल्लंघन करेल त्याच्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असताना अनेक ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड, संवर्धनाबाबत मोठा घोळ असल्याचे दिसते. मंगरूळपीर तालुक्यातील अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी चार बीट तयार करण्यात आल्या असून, यामध्ये कासोळा बीट, वनोजा बीट, येडशी बीट, कोळंबी बीट अशा चार बीटच्या माध्यमातून वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे वनरक्षक आर.आर. निलटकर यांनी सांगीतले.
मंगरुळपीर तालुक्यात अवैध वृक्षतोड
By admin | Updated: October 25, 2014 00:12 IST