वाशिम - महामार्गालगत असलेल्या सरकारी झाडांची अवैध तोड केली जात असल्याचे बुधवारी जांभरून परांडे गावाजनीक दिसून आले. वाशिम ते मालेगाव, वाशिम ते रिसोड, वाशिम ते काटा या मार्गालगत आंबा, बाभूळ, निंब आदी सरकारी झाडे मोठ्या दिमाखाने डोलत आहेत. उन्हाळ्यात या झाडांची अवैध तोड केली जाते. यावर्षीही उन्हाळ्याला सुरूवात होताच झाडांच्या फांद्या तोडणे, झाडाच्या बुंध्याला आग लावून वृक्ष पाडणे आदी प्रकार सुरू झाले आहेत. बुधवारी जांभरून परांडे गावानजीक बाभळीचे झाड अवैधरित्या पाडल्याचे दिसून आले. वृक्षलागवड व वृक्षसंगोपनासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असतानाच, महामार्गालगतच्या झाडांची अवैध तोडही तेवढ्यात जोमात सुरू असल्याचे दिसून येते.
महामार्गालगत अवैध वृक्षतोड !
By admin | Updated: April 19, 2017 19:48 IST