शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून नियमबाह्य रस्ता निर्मिती; पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST

मंगरूळपीर : भूमी अभिलेख कार्यालयाच्या अहवालानुसार गटातील शेताच्या नकाशात रस्ता अस्तित्वात नसताना तसेच तत्कालीन तहसीलदारांनी यासंदर्भात निकाल देऊनही विद्यमान ...

मंगरूळपीर : भूमी अभिलेख कार्यालयाच्या अहवालानुसार गटातील शेताच्या नकाशात रस्ता अस्तित्वात नसताना तसेच तत्कालीन तहसीलदारांनी यासंदर्भात निकाल देऊनही विद्यमान तहसीलदारांच्या आदेशावरून महसूल आणि पोलीस प्रशासनाने सुटीच्या दिवशी शेतातून नियमबाह्य रस्ता निर्मिती केली. त्यासाठी शेतात ट्रॅक्टर फिरल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले, अशी तक्रार सार्सी बोथ (ता. मंगरूळळपीर) येथील शेतकरी रामहरी भोयर व किसन भोयर यांनी महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे २१ सप्टेंबर रोजी केली. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही संबंधितांनी केली.

तक्रारीत नमूद केले आहे की, सार्सी येथील गट क्रमांक ११३ मध्ये जाण्याकरिता गैरअर्जदारांनी रस्ता अडविल्याबाबत तक्रार दाखल केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यावर सुनावणीसाठी ३० सप्टेंबर २०२१ रोजी ही तारीख देण्यात आली आहे. गट नंबर १०१ मधील शेतातून रस्ता नसल्याबाबत कायदेशीर लढाई सुरू असताना तसेच कायद्यानुसार रस्ता मोकळा करण्याकरिता गैरअर्जदाराने दिवाणी दावा दाखल केला आहे. मध्यंतरीच्या काळात तहसीलदार बागडे यांनी कोविड १९ संसर्ग असल्यामुळे प्रकरण सुनावणीकरिता घेतले नाही; परंतु नव्याने नियुक्त झालेले तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी सखोल अभ्यास न करता २८ ऑगस्ट २०२१ रोजी सुटी असतानाही पोलीस बंदोबस्तात नियमबाह्य कार्यवाही करत ट्रॅक्टरद्वारे पिकांचे नुकसान केले. त्याला विरोध केला असता सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून जेलमध्ये टाकू, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणात सात गैरअर्जदार हे शासकीय कर्मचारी असून त्यांनी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे कारवाई न करता गैरअर्जदाराच्या सांगण्यावरून अन्याय करण्यात आला. संबंधित कर्मचारी व तहसीलदारांवर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी रामहरी भोयर व किसन भोयर यांनी केली आहे.

.....................

कोट :

सार्सी बोथ येथे करण्यात आलेली कार्यवाही नियमानुसारच आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे या कार्यवाहीत नुकसान झाले, त्यांना त्याची भरपाई दिली जाईल. ही रक्कम रस्ता अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांकडून वसूल करण्याची बाब प्रस्तावित आहे.

- नरसय्या कोंडागुर्ले, तहसीलदार, मंगरूळपीर