शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध गर्भलिंग निदान केंद्र प्रशासनाच्या ‘रडार’वर!

By admin | Updated: March 16, 2017 03:03 IST

गर्भलिंग निदानसाठी प्रवृत्त करणार्‍यांची माहिती देणार्‍यास २५ हजारांचे बक्षीस.

वाशिम, दि. १५- कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रातील डॉक्टर अथवा अन्य कुणी व्यक्ती, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गर्भलिंग निदान करीत असेल किंवा गर्भलिंग निदानासाठी प्रवृत्त करीत असेल अशा व्यक्तींची माहिती देणार्‍यास २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. यापुढे अवैध गर्भलिंग निदान केंद्र प्रशासनाच्या ह्यरडारह्णवर असतील, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल यांनी केले.जनसामान्यांपयर्ंत ह्यपीसीपीएनडीटीह्ण कायद्याची माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने बुधवार, १५ मार्चला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कक्षात झालेल्या या पत्रपरिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, विधी सल्लागार अँड. राधा नरीवाल उपस्थित होते. डॉ. पटेल म्हणाले की, गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान यंत्र हा लिंग निवडीस प्रतिबंध कायदा १९९४ पासून अस्तित्वात आला आहे. मुलींचे कमी होत असलेले प्रमाण आणि स्त्रीभृण हत्या थांबविणे, गर्भलिंग परीक्षणास प्रतिबंध घालण्यास मदतगार ठरला आहे. या कायद्यानुसार सर्व सोनोग्राफी मशीनला मशीन रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट देण्यात आले आहे. जिल्ह्यात अशा ४४ मशीन कार्यान्वित आहेत. सर्व केंद्रांना गर्भवती महिलांचे एफ फॉर्म ऑनलाइन भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील काही ठिकाणी गर्भलिंग निदानाच्या घडलेल्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर १५ मार्चपासून सर्व सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची प्राधिकारीमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. गर्भलिंग निदान करणार्‍या डॉक्टरांची माहिती देणार्‍या खबर्‍यास २५ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बेकायदा अनोंदणीकृत असलेल्या केंद्रांबाबत तक्रार नोंदविता येईल, असे डॉ. पटेल यांनी यावेळी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर यांनी यावेळी सावित्रीबाई फुले कन्या योजनेविषयी माहिती दिली. अँड. नरीवाल यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये पीसीपीएनडीटी अंतर्गत करण्यात आलेल्या ह्यडीकॉय केसेसह्ण व मुलींचा जन्मदर याविषयी माहिती दिली.