शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाचे अवैध उत्खनन; ५० कोटींचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST

मानोरा : मानोरा तालुक्यातील हातना, आमगव्हाण या दोन गावातील ई- वर्ग जागेवर शेततलाव खोदून परवान्यापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन ...

मानोरा : मानोरा तालुक्यातील हातना, आमगव्हाण या दोन गावातील ई- वर्ग जागेवर शेततलाव खोदून परवान्यापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन केल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्याने मानोरा तहसिलदार एस.बी. जाधव यांनी ३ मे रोजी खोदकाम करणाºया संबंधित कंपनीला ५० कोटींचा दंड ठोठावला. याप्रकरणी ‘लोकमत’ने वेळोवळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते, हे विशेष.

मानोरा तालुक्यातील हातना, आमगव्हाण या दोन गावातील ई- वर्ग जागेवर शेततलाव खोदून त्यामधील गौण खनिज महामार्गाकरीता वापरण्यात यावे असा करार झालेला आहे. या करारानुसार हातना येथून ७९५० ब्रास तर आमगव्हान येथून ८२६८ ब्रास गौण खनिज उत्खनन आणि वाहतुक करण्याचा परवाना कंत्राटदार कंपनीला आहे. परंतु संबंधित कंपनीने सिमांकन केलेल्या जागेबाहेरील डोंगरफोड करुन ६३,३०१ ब्रास मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतुक केल्यासंदर्भात अ‍ॅड. श्रीकृष्ण राठोड यांनी जिल्हा पर्यावरण समिती, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. परंतू, तत्कालिन जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणी विशेष कार्यवाही केली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते.

अ‍ॅड. राठोड यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी याकडे व्यक्तिश: लक्ष देत चौकशी सुरु केली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, रोहयो शाखेचे उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी वाशिम अशा विविध स्तरावर याप्रकरणी चौकशी व सुनावणी झाली. अप्पर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार मानोरा यांना १९ मार्च २०२१ रोजीच्या पत्राद्वारे नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशित केले होते. त्याअनुषंगाने तहसीलदार मानोरा यांनी संबंधित कंपनीकडून खुलासा मागविला. समाधानकारक खुलासा सादर न केल्याने तहसिलदार जाधव यांनी ३ मे रोजी संबंधित कंपनीला ५० कोटी ७७ हजार ९०० रुपयाचा दंड ठोठावला. सदरची रक्कम ही आदेशाची प्रत मिळाल्यापासून ७ दिवसात सरकारजमा करण्याचेही आदेशात नमूद केले आहे. विहित केलेल्या मुदतीत म्हणजेच ७ दिवसात दंडाची रक्कम कंत्राटदार कंपनीने भरली नाही तर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तरतुदीनुसार वसुलीची विनाविलंब कार्यवाही सुरु करावी, असेही तलाठी व मंडळ अधिकारी यांना निर्देश दिलेले आहे. आता तलाठी व मंडळ अधिकारी आपले कर्तव्य कशाप्रकारे पार पाडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.