कारंजा लाड (वाशिम): येथील ग्रामीण रूग्णालयातील कर्मचार्यांच्या बेजबाबदार कामगिरीने कळस गाठल्याचे दिसत आहे. रुग्णालयात सोयीसुविधा असतानाही कर्मचार्यांच्या मनमानी धोरणामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. या ठिकाणी प्रसुतीसाठी दाखल केलेल्या महिलेस डे दुर्लक्ष करून तिचा जीव धोक्यात आणल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर महिलेच्या नातेवाईकांनी समयसुचकता दाखवून खासगी रूग्णालयाचा आधार घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. रूग्णालयात २५ डिसेंबर रोजी गर्भवती महिला दाखल करून तपासणी त्यांनी केली. गर्भावस्थेचा पूर्ण काळ झाल्यामुळे महिलेला प्रसव कळा सुरू झाल्या होत्या आणि त्या वाढतच होत्या; मात्र कारंजा ग्रामीण रुग्णालयात महिलेस योग्य उपचार मिळू शकत नव्हते. नातेवाईक विचारणा करीत असता परिचारिका साहेब आता येतात आणि तपासणी करतात, अशी वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत होती. सायंकाळी ५ वाजता महिलेला भयंकर त्रास होत असल्याचे पाहून अखेर नातेवाईकांनी तिला येथीलच एका खासगी रु ग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर महिलेच्या बाळाने गर्भातच मलविसर्जन केल्याने बाळ आणि महिलेच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे त्यांना कळले. त्या ठिकाणी महिलेवर त्वरीत योग्य उपचार केल्यामुळे प्रसुती होऊन सदर महिलेचा जीव वाचला. नातेवाईकांनी समयसुचकता दाखविली नसती, तर कारंजा ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे महिला आणि बाळ दोघेही दगावले असते. यावर ग्रामीण रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ एन. आर. साळुंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले त्यावेळीच प्रकृती नाजूूक अ सल्यामुळे अकोला येथे हलविणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे आम्हाला फारसे काही करता येत नव्हते, असे स्पष्टीकरण दिले.
प्रसुतीसाठी दाखल महिलेकडे दुर्लक्ष
By admin | Updated: December 28, 2014 01:24 IST