शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्षतोडीकडे वनविभागाची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 17:56 IST

मानोरा: तालुक्यातील कोंडोली ग्रामपंचायतच्या हद्दीत हिरव्यागार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, या संदर्भात माहिती असतानाही वनविभाग आणि महसूल प्रशासनाकडून वृक्षतोड करणाºयांवर कसलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे वृक्षांची कत्तल थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाचीही अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही. कोंडोली येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील ...

ठळक मुद्देग्रामस्थांचे निवेदनही दुर्लक्षीत: मानोरा तालुक्यातील प्रकार 

मानोरा: तालुक्यातील कोंडोली ग्रामपंचायतच्या हद्दीत हिरव्यागार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, या संदर्भात माहिती असतानाही वनविभाग आणि महसूल प्रशासनाकडून वृक्षतोड करणाºयांवर कसलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे वृक्षांची कत्तल थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाचीही अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही. 

कोंडोली येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील महारुख, बाभूळ, तसेच नदीकाठी असलेल्या अंजनाचे वृक्ष गेल्या काही दिवसांपासून अवैध पद्धतीने कापण्यात आली असून, हा प्रकार सुरूच आहे. वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याचे दिसत असतानाही महसूल प्रशासन आणि वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून अद्याप याची दखल घेऊन कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी मानोराच्या तहसीलदारांकडे निवेदनही सादर केले; परंतु त्याचीही दखल घेण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांत कोंडोली परिसरात महारूखाची दोन, बाभळीची ११, कडूनिंबाची ३ आणि अंजनाची ३ मिळून तब्बल १९ हिरव्या वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली आहे. त्यामधील केवळ ३ वृक्ष तोडल्याचा पंचनामा करून तलाठ्यांनी या संदर्भातील अहवाल १५ दिवसांपूर्वी सादर केला असला तरी, कारवाई झाली नसल्याने वृक्षतोड सुरूच आहे. विशेष म्हणजे ही झाडे तोडण्यात येत असताना ग्रामस्थांनी संबंधितांना आवर घालून तलाठ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखविली; परंतु त्यावेळी तलाठी कारवाई न करताच निघून गेले. एकिकडे शासन दरवर्षी कोट्यवधी वृक्षांची लागवड करून ती जगविण्याची जबाबदारीही संबंधित प्रशासनाकडे सोपवित आहे, तर दुसरीकडे त्याच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हिरव्यागार वृक्षांची कत्तल होत असताना कोणतीही कारवाई करीत नाहीत, हा प्रश्न अनाकलनीय आहे.