शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार्‍यांची तूर विक्रीस आणल्यास गुन्हे दाखल करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:22 IST

वाशिम: टोकन वाटप केलेल्या सर्व शेतकर्‍यांची तूर ३१ ऑगस्ट २0१७ पूर्वी खरेदी करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व खरेदी केंद्रांवर खरेदीचा वेग वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी दिल्या. दरम्यान, खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची तूर विक्रीसाठी आणणार्‍यावर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी व्दिवेदी जिल्ह्यातील तूर खरेदीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: टोकन वाटप केलेल्या सर्व शेतकर्‍यांची तूर ३१ ऑगस्ट २0१७ पूर्वी खरेदी करणे आवश्यक असून त्यासाठी सर्व खरेदी केंद्रांवर खरेदीचा वेग वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी दिल्या. दरम्यान, खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची तूर विक्रीसाठी आणणार्‍यावर थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी.एस. ढाकरे, विदर्भ सहकारी पणन संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग ठाकरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक जी.बी. राठोड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निबंधक, खरेदी-विक्री संघाचे सर्व व्यवस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी द्विवेदी पुढे म्हणाले की, विहित मुदतीत तूर खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुट्टीच्या दिवशीही तूर खरेदी सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तूर खरेदीला गती मिळाली असली तरी तूर खरेदीचा वेग अजून वाढविणे आवश्यक आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकर्‍यांकडे असलेली तूर लवकरात लवकर खरेदी करण्याच्या दृष्टीने सर्व खरेदी केंद्रांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. खरेदी केलेली तूर साठवण्याचा प्रश्न मिटला असून तूर खरेदीला गती द्या, व्यापार्‍यांची तूर कोणत्याही केंद्रावर खरेदी होणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच व्यापार्‍याची तूर विक्रीस आणणार्‍या व्यक्तीवर जागीच गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या.