शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या शूटिंगसाठी विनापरवानगी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:34 IST

वाशिम: प्री वेडिंग किंवा शूटिंग ड्राेनव्दारे करायची असेल तर ड्राेनचे लायसन्स व उडविण्याची स्थानिक पाेलिसांकडून परवानगी आवश्यक आहे. ...

वाशिम: प्री वेडिंग किंवा शूटिंग ड्राेनव्दारे करायची असेल तर ड्राेनचे लायसन्स व उडविण्याची स्थानिक पाेलिसांकडून परवानगी आवश्यक आहे. अन्यथा आपल्यावर कारवाई हाेऊ शकते, अशी माहिती पाेलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

महानगरांनंतर आता छोट्या शहरांमध्येही ड्राेनव्दारे फाेटाे, शूटिंगची ‘क्रेझ’ वाढत आहे. यापूर्वी केवळ उच्चभ्रू लोकांकडूनच पसंती दिली जात होती. आता अनेक ठिकाणी याचा वापर केला जाताेय. वाशिम शहरामध्येही तीन व्यावसायिकांकडे ड्राेन उपलब्ध आहेत. पूर्वी नजीकच्या अकाेला, अमरावती जिल्ह्यातून आणून लग्नात यापूर्वी ड्राेनव्दारे शूटिंग करण्यात येत हाेती. परंतु ग्राहकच नसल्याने ड्राेन अडगळीत पडले आहेत

---------

ड्रोन उडवण्यासाठी नियम आणि कायदे

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमानुसार ड्रोन विक्री आणि उडवण्याबाबत नियम आणि कायदे निश्चित केले आहे.

वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ड्रोन उडवण्यास परवानगी मिळते.

काेणत्याही कार्यात ड्राेन उडवायचे असल्यास स्थानिक पाेलीस प्रशासनास सांगणे गरजेचे.

-----

ड्रोन वापरण्याचेही नियम

व्यावसायिक किंवा करमणुकीच्या उद्देशाने २५० ग्रॅम ते २५ किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोन उड्डाणासाठी परवाना आवश्यक असणे आवश्यक आहे.

मर्यादित उंची आणि क्षेत्रामध्ये ड्रोन उडवण्यास परवानगी दिली जाते; मात्र ड्रोनद्वारे कोणतीही धोकादायक वस्तू वाहून नेण्यास मनाई आहे.

पोलीस परवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाही. त्यासाठी रीतसर स्थानिक पोलिसांना अर्ज करावा लागतो.

संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, कोणत्या कारणासाठी ड्रोन उडवणार आहे, किती कालावधीसाठी याची माहिती घेतल्या जाते.

नॅनो श्रेणीतील ड्रोन वगळता वैध परवाना किंवा परवानगीशिवाय ड्रोन उडवणाऱ्यास दंड हाेऊ शकताे. नाे फ्लाईंग झाेन असल्यास ड्राेन उडविता येत नाही.

कोणताही लहान ड्रोन १२० मीटर उंचीपेक्षा अधिक आणि कमाल २५ मीटर प्रतिसेकंद वेगापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करण्यास मनाई.

-----------

रु. १०हजार खर्च येतो एका शूटिंगचा

ड्राेनव्दारे फाेटाे शूट किंवा शूटिंग काढायची असल्यास आधी बाहेरगावाहून ड्राेन असणाऱ्याशी संपर्क साधावा लागत हाेता. ताे जवळपास २० ते २५ हजार रुपये हाेता.

वाशिम येथे ड्राेन आले हाेते तेव्हा एक, दाेन लग्नात शूटिंग झाली आहे. खर्च १० हजारांच्या जवळपास लागताेय. परंतु ग्राहक पाहिजे तसे नाहीत.

.....

वाशिम शहरात अद्याप ड्राेनव्दारे फाेटाे, शूटिंग करण्यासाठी काेणी विचारत नाहीत. काही बाेटावर माेजण्याइतपत व्यक्ती विचारणा करतात, उच्च दर्जाचे शहरात ड्राेन नसल्याने फाेटाे व्यवस्थित येत नाहीत. सध्या लग्नसराई बंद असल्याने संपूर्ण व्यवसायच ठप्प पडलेला आहे.

सुभाष जाधव, फाेटाेग्राफर, वाशिम