शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : गावात शाळाच नसली तर गोरगरीब मुले शिकतील कसे? वाशिम जिल्ह्यातील नऊ शाळांवर गडांतर

By संतोष वानखडे | Updated: May 4, 2023 18:04 IST

कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळा क्लस्टर शाळेला जोडण्याच्या हालचाली सुरू असल्याने, कमी पटसंख्या असणाऱ्या गावात यापुढे जि.प.ची शाळा नसणार हे स्पष्ट होत आहे.

वाशिम : कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळा क्लस्टर शाळेला जोडण्याच्या हालचाली सुरू असल्याने, कमी पटसंख्या असणाऱ्या गावात यापुढे जि.प.ची शाळा नसणार हे स्पष्ट होत आहे. गावात शाळाच नसली तर गोरगरीबांची मुले शिकतील कसे? असा प्रश्न उपस्थित करून कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषदेच्या शाळा क्लस्टर शाळेला न जोडण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य सरस्वती मोहन चौधरी यांनी ४ मे रोजी शिक्षणाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनानुसार, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीन विकास करण्याकरीता कमी पट संख्या असणाऱ्या शाळेवर शासनाच्या माध्यमातून क्लस्टर शाळा हा पर्याय निर्माण अवस्थेत आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यात ९ ते १० यांसह राज्यभरातील ४५०० शाळा बाधित होण्याची भीती आहे. राज्यातील आठ हजारावर शिक्षकांच्या समायोजनाचाही प्रश्न निर्माण होईल. राज्यशासन त्या आठ हजार शिक्षकांना कुठेतरी पर्याय म्हणून समायोजन करेल. परंतु त्या ४५०० गावातून यापुढे जि.प.ची शाळाच नसणार आहे. त्यामुळे त्या गावातील गोरगरीब मुलांनी शिक्षण कसे घ्यावे? असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य सरस्वती चौधरी यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचे धडे मिळावे याकरीता कमी पटसंख्येच्या जि.प. शाळा क्लस्टर शाळेला जोडण्यात येवू नये, अशी मागणीही चौधरी यांनी केली.जिल्ह्यातील ९ शाळांवर गडांतर?

कमी पटसंख्येच्या शाळा क्लस्टर शाळेला जोडल्यास जिल्ह्यातील ९ ते १० जिल्हा परिषद शाळांवर गडांतर येण्याची भीती वर्तविण्यात आली. या खेड्यांतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे शिक्षणाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी जि.प. सदस्य चौधरी यांनी गुरूवारी केली.