शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'ऑथराईझ नाही मी तुम्हाला काही सांगायला..." परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर वाशिममध्ये रुजू

By नंदकिशोर नारे | Updated: July 11, 2024 18:56 IST

वेळापत्रकानुसार दिली जाणार जबाबदारी

वाशिम : विविध विषयांबाबत गाजत असलेल्या आयएएस अधिकारी पुजा खेडकर ‘ऑथराईझ नाही मी तुम्हाला काही सांगायला’ असे म्हणत गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यात.

परीविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू  हाेणार तेव्हा पत्रकारांनी त्यांच्यावर हाेत असलेल्या आराेपाबाबत त्यांना छेडले असता त्यांनी स्वाॅरी, गर्व्हमेंट रुलनुसार मी तुम्हाला काहीही सांगायला तयार नसल्याचे म्हणत पदभार  स्विकारला. त्यांची पुणे येथून वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना ठराविक वेळापत्रकानुसार जबाबदारी दिली जाणार आहे.

महाराष्ट्र केडरच्या २०२२ बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर व्हीआयपी मागण्यांमुळे वादात सापडल्या आहेत. तसेच त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट दृष्टिदोष (व्हिज्युअली इम्पेअर्ड) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाणपत्र कथितपणे सादर केली, असा खुलासा एका अधिकाऱ्याने बुधवारी केला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ॲंटी चेंबरवर कब्जा करण्यासह पूजा खेडकर त्यांच्या खासगी ऑडी कारवर लाल-निळा दिवा आणि व्हीआयपी नंबर प्लेट वापरत होत्या, तसेच प्रोबेशनरी आयएएस अधिकारी असताना पदाचा गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या. त्याची दखल घेत त्यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली, त्यामुळे त्या चर्चेत आहेत. वाशिम येथे रुजू हाेतांना त्यांनी आपण वाशिममध्ये काम करण्यास उत्सूक असल्याचेही बाेलल्यात.