शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो शेतक-यांची घेतली समृद्धी मार्गासाठी जमीन न देण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 19:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासाठी जमीन न देण्याची शपथ मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेकडो प्रकल्पबाधितांनी शनिवारी घेतली. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाविरोधातील संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाºयांचा या मार्गाबाबत शेतकºयांचे मत जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू आहे. याच अंतर्गत या समितीने शनिवारी मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे शेकडो ...

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे पार पडली सभा विविध पदाधिका-यांची उपस्थिती 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासाठी जमीन न देण्याची शपथ मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेकडो प्रकल्पबाधितांनी शनिवारी घेतली. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाविरोधातील संघर्ष समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाºयांचा या मार्गाबाबत शेतकºयांचे मत जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा सुरू आहे. याच अंतर्गत या समितीने शनिवारी मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे शेकडो शेतकºयांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन केले होते. या सभेला जिल्हा परिषद वाशिमचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर गोळे, नाशिकचे राजू देसले, शहापूरचे बबनराव हरणे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. या सभेत शेकडो शेतकºयांनी समृद्धी महामार्गासाठी जमीन न देण्याची शपथ घेतली. या सभेला संबोधित करताना बबनराव हरणे म्हणाले, की या मार्गाबाबत शासन अद्यापही शेतकºयांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. आमचा विकासाला विरोध नाही; परंतु शासनाची भूसंपादन पद्धत चुकीची आहे. ती आम्हाला मान्य नाही. वाटाघाटीने रेडीरेकनरच्या पाच पट रकमेऐवजी २०१३ च्या कायद्यानुसार बाजारमुल्याच्या पाच पट मोबदला द्यावा, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.