शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हवालदिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:28 IST

शेतातील सोयाबीनचे बियाणे न उगविल्यासंदर्भात त्रिस्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या अहवालावर महाबीजने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे आता सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने कृषी विभागाने पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, या मागणीसाठी शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत.

ठळक मुद्देबियाण्यासंदर्भात महाबीजचा अहवाल अप्राप्त नापिकीबाबत तक्रारींचा ओघ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतातील सोयाबीनचे बियाणे न उगविल्यासंदर्भात त्रिस्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या अहवालावर महाबीजने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे आता सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने कृषी विभागाने पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, या मागणीसाठी शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत.यावर्षी पेरणीच्या हंगामात मानोरा तालुक्यातील जवळपास ४00 एकरांवरील महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविले नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी तालुका व जिल्हा कृषी विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २८ जून रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी आवाज उठविला होता. त्रिसदस्यीय समितीद्वारे घटनास्थळाला भेट पाहणी अहवाल तयार करण्याची मागणी लावून धरली होती. याची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापत्रे यांना दिले होते. तातडीने त्रिसदस्यीय समिती नेमून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता खूपच कमी असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले. यासंदर्भातील अहवाल कृषी विभागाच्यावतीने महाबीजच्या विभागीय व्यवस्थापकांकडे जुलै महिन्यात पाठविण्यात आला. जुलै व ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्याप महाबीजने हा अहवालावर उत्तर दिले नाही किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला नाही, असे कृषी विकास अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या अहवालावर शेतकर्‍यांना मिळणारी नुकसान भरपाई अवलंबून आहे. बियाणे उगवले नसल्याने जवळपास १00 शेतकर्‍यांना जबर फटका बसला आहे. मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यातील बियाणे उगविले नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी होत्या. याचा अहवालदेखील अप्राप्त आहे. आता नापिकी असल्याने प्रशासनाने सर्व्हे करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. 

भेसळयुक्त बियाण्यांवरही कार्यवाही नाही मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील गोविंदा मोतीराम भगत यांच्या शेतात महाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार जुलै महिन्यात उघडकीस आला होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल कृषी विभागाने १ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतात अन्य प्रकारचे ७0 टक्के बियाणे असल्याचे कृषी विभागाच्या चमूला आढळून आले होते. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी गोविंदा भगत यांनी केलेली आहे. अद्याप यावर कुठलीच कार्यवाही नाही.

पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमकपावसात सातत्य नसल्याने व गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आता हलक्या जमिनीवरील सोयाबीन पीक हातचे गेले आहे, तर दज्रेदार जमिनीवरील सोयाबीन धोक्याच्या पातळीवर आहे. कारंजा, मानोरा, रिसोड, मंगरूळपीर तालुक्यातील शेकडो एकरावरील सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे पाहणी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने पाहणी करून अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे यांच्यासह शेतकर्‍यांनी बुधवारी केली.-