शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

फळबाग योजनेला तिलांजली

By admin | Updated: November 4, 2015 03:03 IST

मानोरा तालुक्यात शेकडो हेक्टरचे प्रस्ताव धूळ खात!

जगदीश राठोड / मानोरा (जि. वाशिम) : शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा यासाठी शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत; परंतु प्रत्यक्षात शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळत नाही. अधिकार्‍यांना योजना राबविण्यासाठी स्वारस्य नसल्याने मूळ उद्देशाला मूठमाती मिळत आहे. मानोरा तालुक्यात फळबाग योजनेची हीच परिस्थिती आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेकडो हेक्टरचे प्रस्ताव धूळ खात संबंधितांकडे पडून आहे. कृषी विभागाकडून अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी फळबाग योजना राबविली जात आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी अनेक अर्ज दाखल झालेले आहेत. सुरुवातीला कृषी विभाग, त्यानंतर तसहील प्रशासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले जातात; परंतु तत्काळ, तर दूर कित्येक वर्षापर्यंंत प्रस्तावावरची धूळ झटकली जात नाही आणि चुकून प्रस्तावांच्या फाइलला हात लागला तरी विविध प्रकारच्या त्रुट्या काढून संबंधिताना वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जाते. प्रत्यक्षात कृषी विभागानेच त्रुटीची पूर्तत: करून फाइल तहसील कार्यालयाकडे पाठविण्याचे अपेक्षा आहे; परंतु त्यांनाही या विषयात स्वारस्य नाही. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या अनेक लोकाच्या फायली मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यानच्या काळात काही लोकांना कृषी विभागाने पुळझाडे लावण्यासाठी शेतजमिनीवर खड्डे खोदून ठेवण्याचा सल्ला दिला आशेपोटी शेतकर्‍यांनीही प्रक्रिया पूर्ण केली; परंतु फळझाडासाठीच्या प्रस्तावाला मंजुरीच दिली नाही. यात शेतकर्‍यांचा पैसा व्यर्थ गेला. तहसील आणि कृषी विभागामध्ये समन्वय नसल्याने शेतकर्‍यांची गळचेपी सुरू आहे. सदर योजनाच फसवी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. कोरडवाहू शेती बेभरवशी झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा ओलीत करून विविध प्रकारचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. तरीही तहसील विभाग केवळ प्रस्ताव मंजूर करण्यातही चालढकल करत आहे.