शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

१८ हजार बेघरांना मिळणार घर!

By admin | Updated: September 2, 2016 01:23 IST

प्रधानमंत्री आवास योजनेचा कृषी सभापतींनी घेतला आढावा.

वाशिम, दि. १ : प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यात सन २0१६-१७ या वर्षात १७ हजार ५00 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असून, ग्रामीण भागातील पात्र व बेघर कुटुंबीयांना या घरकुलांचा लाभ मिळावा म्हणून कृषी सभापतींनी ग्रामसेवकांशी चर्चा करून बुधवारी आढावा घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २0२२ पर्यंत ह्यसर्वांसाठी घरह्ण या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचा पहिला टप्पा २0१६-१७ ते २0१८-१९ पर्यंत आहे. नवीन घरकुल निर्माण करण्यासाठी ग्रामीण स्तरावर ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र लाभार्थींंची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, या यादीमध्ये गावातील गोरगरीब कुटुंबाला १00 टक्के लाभ मिळावा, म्हणून ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तर व जिल्हास्तरीय ग्रामीण विकास यंत्रणेकडून योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप यांनी व्यक्त केली. अनेक गावांमध्ये नवीन लाभार्थींचे नाव समाविष्ट करण्यात येत नसल्याचे निदर्शनात आले असून, ही गंभीर बाब असल्याचे सानप म्हणाले. शासन निर्णयातील अ, ब, क, ड अनुक्रमांकानुसार याद्या न बनविता जुन्याच याद्यांचे वाचन करून त्यातील पात्र लाभार्थीचा समावेश नवीन यादीमध्ये होत आहे. या योजनेबाबत इत्थंभूत माहिती नसल्याने पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सदर योजनेतील पात्र लाभार्थींंना शासनामार्फत १ लाख २0 हजार रुपये रोख व ७0 हजार रुपयांपर्यंंत रक्कम कर्ज स्वरूपात मिळणार आहे. शासन निर्णयानुसार अनुक्रमांक ड प्रकारच्या यादीमध्ये नवीन पात्र लोकांचा समावेश होणे गरजेचे आहे. गावातील राजकीय मतभेद बाजूला सारून सरपंच व ग्रामसेवकांनी सर्व समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या व ज्यांना कच्चे घर आहे, अशा कुटुंबाना या योजनेत प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशा सूचना सानप यांनी केल्या. या योजनेची माहिती व प्रसिद्धी करण्याकरिता विश्‍वनाथ सानप मित्रमंडळ हे गावोगावी फलक, पोस्टर व जनजागृती करून योग्य मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी सानप म्हणाले. यानंतरही या योजनेसंदर्भात काही अडचणी असल्यास रिसोड व मालेगाव तालुक्यातील संबंधित लाभार्थींंनी विश्‍वनाथ सानप यांचे जनसंपर्क कार्यालय व खासदार भावना गवळी यांचे जनसंपर्क कार्यालय रिसोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन सभापती विश्‍वनाथ सानप यांनी केले.