शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या पडझडींचा सर्व्हेच नाही!

By admin | Updated: August 15, 2016 02:25 IST

जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या पडझडीचे सर्वेक्षणच नाही; जिल्हा परिषद अध्यक्षाचे पत्र.

वाशिम, दि. १४: जुलै व ऑगस्ट या महिन्यातील अतवृष्टीने जिल्ह्यातील किती घरांची व सिंचन विहिरींची पडझड झाली, याचा सर्व्हे करण्यात आला नाही. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. जुलैचा संपूर्ण महिना तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. यामुळे बळीराजा सुखावला. मात्र, पावसाचा जोर अधिक असलेल्या भागात काही घरांची पडझड झाली तसेच सिंचन विहिरी खचल्या. या नुकसानाचा सर्व्हे केल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर होणे अपेक्षित आहे. गावपातळीवर सर्वेक्षण झाले नसल्याने नुकसानग्रस्त लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ जुलै रोजी वाशिम शहरातील पंचशीलनगरमध्ये वाल्मीकी-आंबेडकर आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलाचे छत कोसळले होते. ग्रामीण भागातही अनेक घरांची पडझड झाली. तसेच सिंचन विहिरी खचल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना शासनाचे अर्थसहाय्य मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ग्रामीण भागाचा सर्व्हे करून अहवाल तयार करावा आणि शासनाकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केली. यावर शासनाकडे अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.