शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जबर मारहाण करून इसमाचे अपहरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:56 IST

वाशिम: स्थानिक खोडेमाऊली नगर येथे वास्तव्यास असलेले भारत शिंदे (वय ४२ वर्षे) यांना चार ते पाच लोकांनी जबर मारहाण करून त्यांचे अपहरण केले. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तथा शिंदे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत तीन आरोपींना अवघ्या काही तासांतच अटक करून जखमी शिंदे यांना उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. ही गंभीर घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.

ठळक मुद्देवाशिम येथील घटना आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्थानिक खोडेमाऊली नगर येथे वास्तव्यास असलेले भारत शिंदे (वय ४२ वर्षे) यांना चार ते पाच लोकांनी जबर मारहाण करून त्यांचे अपहरण केले. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तथा शिंदे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत तीन आरोपींना अवघ्या काही तासांतच अटक करून जखमी शिंदे यांना उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. ही गंभीर घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली.यासंदर्भात शिंदे यांच्या पत्नी लताबाई यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की त्यांचे पती भारत यांना खोडेमाऊली नगर येथे चार ते पाच लोकांनी मारहाण करून बेशुद्ध पाडले व त्यानंतर त्यांना एमएच ३७ जी १७३८ या क्रमांकाच्या वाहनात टाकून घटनास्थळाहून पोबारा केला. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक विजय पाटकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अवचार, पोलीस उपनिरीक्षक मस्के, राजेश बायस्कर, प्रशांत अंभोरे, गजानन कर्‍हाळे,  सुषमा रंगारी यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेची माहिती जाणून घेतली व त्याआधारे नमूद क्रमांकाच्या वाहनाचा शोध घेतला. यादरम्यान सदर वाहन कोंडाळा रोड, शिक्षक कॉलनीसमोरील मुरलीधर गणपत वाणी यांच्या शेतासमोर उभे असल्याचे आढळून आले. वाहनाशेजारी असलेल्या टिनपत्र्याच्या खोलीची पाहणी केली असता, तेथे मुरलीधर वाणी, दौलत इंगोले,  लीलाबाई वाणी हजर होते. यासह गंभीर जखमी अवस्थेत भारत शिंदे हेदेखील पडून असल्याचे पोलीस तपासात दिसून आले. यावेळी पोलिसांनी वाहनासह नमूद सर्व आरोपींना ताब्यात घेतले. जखमी शिंदे यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांची अकोला येथे रवानगी करण्यात आली. तथापि, पोलिसांनी अपघ्या काही तासांतच घटनेचा शोध लावल्याने भारत शिंदे यांचे प्राण बचावले. याप्रकरणी लताबाई शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.