पातुर्डा (जि. बुलडाणा) : पेरणीपूर्व मशागतीसाठी गेलेल्या शेतकर्याचा घरी परतत असताना उष्माघाताने वाटेतच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता पातुर्डा येथे घडली. मुरलीधर नारायण दसोरे (६५) हे बुधवारी शेतातील कामे आटोपून घरी परत येत असताना इंदिरानगर भागातील अचानक रस्त्यावरच कोसळले. ह्यपाणी पाणीह्ण असे ओरडत त्यांनी हात-पाय घासले; मात्र जवळपास कोणीही नसल्याने त्यांना तातडीने पाणी मिळाले नाही व अशातच त्यांचा मृत्यू झाला. मुरलीधर दसोरे हे अल्पभूधारक व कर्जबाजारी शेतकरी होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व आप्त परिवार आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे ४७ वर्षीय शेख मजिद या शेतमजुराचा मृतदेह बुधवारी आढळून आला. त्या इसमाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समजते. तथापि, याबाबत आरोग्य केंद्राच्या अधिकार्यांकडून पुष्टी होऊ शकली नाही.
उष्माघाताने शेतक-याचा मृत्यू
By admin | Updated: May 21, 2015 01:48 IST