शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघात कक्ष केवळ दिखाव्यापुरतेच!

By admin | Updated: April 26, 2017 01:26 IST

जिल्ह्यातील वास्तव: आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव

स्टिंग आॅपरेशन वाशिम : उन्हाचा पारा गेल्या आठवड्यापासून चढलेला आहे. जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व सोयी-सुविधायुक्त उष्माघात कक्ष निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयात उष्माघात नावालाच स्थापन करण्यात आले असून, या कक्षात सोयी-सुविधांची वानवा असल्याचे चित्र ‘लोकमत’ने २५ एप्रिल रोजी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयांत २५ एप्रिल रोजी ‘लोकमत’च्या चमूने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यावेळी तीन रुग्णालयात उष्माघात झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केवळ दिखावा म्हणून उष्माघात कक्ष स्थापन केला. यातील रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयांत ठेवलेला कूलर पाण्याविनाच चालविला जात असल्याचे दिसले, तर खिडक्यांना उन्हास प्रतिरोध करणाऱ्या पडदेही लावले नसल्याचे दिसून आले. कारंजा येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याऐवजी उपलब्ध वार्डातच दोन कूलर ठेवून तकलादू सुविधा करण्याचा केविलवाना प्र्रयत्न करण्याता. मानोरा येथे एका वार्डात उष्माघात कक्ष म्हणून फलक लावला; परंतु आतमध्ये खाटांवर केवळ पांढऱ्या चादरी टाकून ठेवण्यापलिकडे कुठलीही आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे आणि त्या ठिकाणचा कूलर पाण्याविनाच असल्याचे दिसले. विशेष म्हणजे हा कक्ष दुपारच्या सुमारास कूलुप बंद असल्याचे आणि रुग्ण इतरच वार्डात ठेवल्याचेही दिसले. सध्या जिल्ह्यातील तापमान उच्चांक गाठत आहे. अशा तापमानामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. अशा स्थितीत सामान्यत: सरकारी रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष निर्माण केले जातात; परंतु जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण रुग्णालयात अद्याप उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षच निर्माण करण्यात आलेला नाही. तर ज्या ठिकाणी उष्माघात कक्ष आहेत. त्या ठिकाणी रुग्णांना कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र होते. रुग्णालयात स्वतंत्र कक्ष नसला तरी, उपलब्ध असलेल्या कक्षात उष्माघाताच्या रुग्णांसाठी सुविधांची पूर्तता करून ते सज्ज करण्यात आले आहेत. या वार्डमध्ये प्रत्येकी एक कुलर ठेवण्यात आला असून, त्यामध्ये नियमित पाणी टाकले जाते. - एन. आर. साळुंके, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय कारंजा लाड