शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनापेक्षा पीपीई किटमुळेच आरोग्य कर्मचारी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:41 IST

जिल्हा रुग्णालयासह इतर सर्वच कोरोना रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कोरोनापासून बचाव व्हावा, ...

जिल्हा रुग्णालयासह इतर सर्वच कोरोना रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी पीपीई किटचा वापर करतात. सुरुवातीच्या काळात या किट दर्जेदार असल्याने त्या वापरताना त्रास होत नव्हता; परंतु आता राज्यस्तरावरून पुरविल्या जाणाऱ्या किट निकृष्ट दर्जाच्या आहेत. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढत असताना ही किट अंगात घालताच पुढच्या पाच मिनिटांत व्यक्ती घामाघूम होऊन जातो. प्लास्टिक स्वरुपाच्या या किट सहा तास अंगात ठेवून कर्तव्य बजावणारे कर्मचारी पुरते वैतागले आहेत. या किटमधून शरीराला हवाच लागत नसल्याने अंगातून घामाच्या धारा निघत असून, बुटातही मोठी घाण साचत आहे. त्यामुळे या किट वापरण्याबाबत कर्मचारी उदासीन दिसत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी त्यांचे नाव न छापण्याच्या अटीवर पीपीई किटमुळे होणारा त्रास सांगितला; परंतु ते सांगत असतानाही त्यांच्या अंगावर काटा येत होता.

--------

१) ही किट घालण्यापेक्षा पीपीई दोन शर्ट आणि दोन पँट, ग्लोव्हज आणि मास्क बरे वाटेल. कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशी खेळती हवाही नाही. कक्षात रुग्णांची माहिती घेताना ही किट घालून फिरलो तरी घामाने पूर्ण अंग भिजते.

--------

२) गर्मी खूप वाढली आहे. त्यात किट दर्जेदार नाहीत. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून हे घालण्याची सक्ती आहे; परंतु आता कोरोना संसर्गाच्या भीतीपेक्षा या किटचाच अधिक वैताग आला आहे.

----------

३) आम्हाला कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई किट घालाव्या लागतात; परंतु या किटमुळे अधिकच त्रास होत आहे. अंग घामाने भिजल्याने सतत खाज सुटते मग किट काढून टाकावीशी वाटते. यापेक्षा केवळ मास्क आणि ग्लोव्हज बरे राहतील.

--------------

काहींनी किट घालणेच सोडले

१) नव्या पीपीई किटमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून काही डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांसह कक्ष सेवकांनी या किट वापरणेच सोडले आहे.

२) केवळ मास्क व ग्लोव्हजचा वापर त्यांच्याकडून होत आहे.

३) ही वस्तुस्थिती पाहता आरोग्य कर्मचारी, अधिकारी नव्या पीपीई किटमुळे वैतागल्याचे दिसत आहे.

---------

कोट: कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्यांसह कक्षातील व्यक्तींना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई किट वापराव्या लागतात. या किटचा दर्जा चांगला नसेल, तर वरिष्ठस्तरावर तसे कळवून दर्जा सुधारण्याची मागणी करू.

-डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

----------------

एकूण कोरोनाबाधित : १५६२५

बरे झालेले : १२७१६

उपचार सुरू असलेले : २७२३

कोरोना बळी : १८५

------------

दररोज पीपीई किटचा वापर -३५०