शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये 'हर हर महादेव'चा गजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 14:43 IST

वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्वर व सर्वात जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट रोजी कावड मंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर हर महादेवाचा’ गजर ऐकायला मिळत होता.

वाशिम, दि. 14  - वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्वर व सर्वात जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट रोजी कावड मंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर हर महादेवाचा’ गजर ऐकायला मिळत होता.  वाशिम शहरामध्ये तीर्थक्षेत्र काशीनंतर सर्वात जास्त महादेवाची मंदिरं आहेत, असे ‘वत्सगुल्म महात्म्य ’ यामध्ये म्हटले आहे. येथे शिवभाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दरवर्षी कावड मंडळाच्यावतीने मिरवणूक काढून शिवलिंगास अभिषेक, पूजाअर्चा तसेच शिवाच्या पवित्र तीर्थस्थळावरुन आणलेले तीर्थाचे पूजन केले जाते. 

श्रावणमासात शिवजींच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. 14 ऑगस्ट रोजी श्रावणमासातील चौथा सोमवार असल्याने यानिमित्त कावड मंडळाच्यावतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. कावड मंडळाची मिरवणूक सकाळपासूनच शहरातून निघून एका ठिकाणी जाण्यास सुरुवात झाली होती.  यावेळी विविध भाविकांच्यावतिने कावड मंडळाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांचे स्वागतासाठी कमानी उभारण्यात येऊन त्यांच्या चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास 35 कावड मंडळातील शेकडो भाविकांनी काढलेल्या या मिरवणुकीने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. शहरातील मन्नासिंह चौक, गाभणे गल्ली, राजनी चौक, नगरपरिषद चौक, दंडे चौक, गणेशपेठ, टिळक चौकासह शहरातील मार्गांवर महिलांनी सडा सारवण करुन रांगोळी घातलेली आढळून आली.