निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेलू बु. येथील १५ वर्षीय आदिवासी समाजाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या करणाऱ्या आरोपींविरुद्ध अपेक्षित कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. परिणामी, समाजात असंतोष निर्माण झाला आहे. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी बेजबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून दोषी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी; अन्यथा जिल्हाभर आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदनावर अ.भा. आदिवासी विकास परिषद, ऑफरोट, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी बंडू वाघमारे, आनंद खुळे, किसन करवते, आनंद पवार, गजानन गिऱ्हे, सुभाष मोरकर, बलदेव साखरकर, सुखदेव ढंगारे, रमानंद ढंगारे, गजानन ढोके, प्रवीण पंधोर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.