शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गारपिटीने ४८८० हेक्टरवरील पिकांना जबर फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST

१९ मार्च रोजी ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानाबाबत जिल्ह्यातील सहाही तहसीलदारांकडून प्राप्त माहितीवरून एकत्रित प्राथमिक अहवाल तयार करून ...

१९ मार्च रोजी ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानाबाबत जिल्ह्यातील सहाही तहसीलदारांकडून प्राप्त माहितीवरून एकत्रित प्राथमिक अहवाल तयार करून तो विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील वाशिम, कोंडाळा झामरे, नागठाणा, पार्डी आसरा, पार्डी टकमोर, अनसिंग या महसूल मंडळात १६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. या मंडळांतर्गत येणाºया गावांमधील २१२३ शेतकरी यामुळे बाधीत झाले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा, मुंगळा, करंजी, चांडस व शिरपूर महसूली मंडळात ११३२ हेक्टरवरील गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला, टरबूज, शेवगा, पपई व सोयाबीन या पिकांना जबर फटका बसला. यामुळे १८०० शेतकºयांचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील केनवड व गोवर्धन महसूली मंडळात १४७६ हेक्टरवरील कांदा, पपई, उन्हाळी मूग आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन १८९३ शेतकरी बाधीत झाले. मंगरूळपीर तालुक्यात आसेगाव महसूली मंडळात ४६ हेक्टरवरील गहू, हरभरा, रबी ज्वारी, मूग, कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन ९६ शेतकºयांचे नुकसान झाले; तर मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, कुपटा, शेंदुरजना, गिरोली व उमरी बु. महसूली मंडळात ५३१ हेक्टरवरील हरभरा, ज्वारी, गहू आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून ८६५ शेतकºयांना फटका बसल्याचे प्रशासनाने प्राथमिक अहवालामध्ये नमूद केले आहे.

............................................

अहवालात कारंजा तालुका निरंक

१९ मार्च रोजी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, वादळीवारा आणि गारपीटीने ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे; मात्र कारंजा तालुक्यात नुकसानाचे प्रमाण निरंक असल्याचे दिसून येत आहे; तर उर्वरित पाच तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान वाशिम तालुक्यात आणि सर्वात कमी नुकसान मंगरूळपीर तालुक्यात झाले आहे.

......................

तालुकानिहाय बाधित क्षेत्र व नुकसानग्रस्त शेतकरी संख्या

वाशिम - १६९३.२९ - २१२३

मालेगाव - ११३२.९० - १८००

रिसोड - १४७६.९० - १८१३

मंगरूळपीर - ४६.३० - ९६

मानोरा - ५३१ - ८६५

कारंजा - ०० - ००

१) बाधित क्षेत्र (हे.आर.), २) नुकसानग्रस्त शेतकरी