शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मदतीपासुन मंगरूळपीर तालुक्यातील गारपीटग्रस्त वंचीत

By admin | Updated: June 21, 2014 00:33 IST

गारपीटीची मदत अद्यापही काही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

मंगरूळपीर : मार्च महिण्यात झालेल्या गारपीटीची मदत अद्यापही काही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. शासनकडे गारपीटीची मदत १ कोटी ९२ लाखाची मागणी महसुल विभागानी केली असुन १३८ गावातील १६ हजार ७२१ शेतकरी खातेदारांपैकी बर्‍याच शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली नसल्याने तहसिल कार्यालयात गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गतवर्षी १४ जून रोजी तालुक्यात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे सर्वच लहान मोठी धरणे १00 टक्के भरली होती. त्यानंतर खरीप हंगाम ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडले होते नदी नाले दुथडी भरून वाहत होती.अतवृष्टीमुळे जिल्हय़ात सर्वाधीक नुकसानीची झळ मंगरूळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांना बसली होती. अतवृष्टीचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत नाही तोच रब्बी हंगामात अवेळी पावसाचा प्रकोप व गारपीट झाली त्यात ही गहु,हरभरा,फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते.गारपीटीमुळे तालुक्यात ७ हजार ९७७.५१ क्षेत्रफळाचे नुकसान झाले होते. महसुल विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करून शासनाकडे नुकसानीचा आकडा देण्यात आला होता तेव्हा पहिला टप्पा १ कोटी ३९ लाख ३ हजार ७६८ रूपये प्राप्त झाले होते.त्यानंतर ९ कोटी ३१ लाख ५७ हजार २0६ रूपये बिडीएसव्दारे प्राप्त झाले असे एकुण १0 कोटी ७0 लाख ६0 हजार ९७४ रूपयांचे अनुदान मिळाले मात्र अद्यापही शासनाकडुन १ कोटी ९२ लाखांची अनुदान रक्कम अप्राप्त आहे. या रक्कमेची मागणी करण्यात आली आहे गारपीटीची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याने शेतकर्‍यांची विचारणा करण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे गारपीटीची मदत ऐन पेरणीच्या तोंडावर मिळाली तर शेतकर्‍यांना त्याचा निश्‍चित फायदा होईल त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनानी प्रयत्न करणे गरजेचे असून तशी मागणी शेतकर्‍यांतून केल्या जात आहे.