पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता सुरु करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत २१ ऑगस्ट राेजी मालेगांव शहरातील शिवचौक येथे पाेलीस उपनिरीक्षक सारिका नारखडे व रात्रगस्तवरील कर्मचारी हे नाकाबंदी करीत असताना पहाटे ५ च्या सुमारास टेम्पो क्र. एम.एच. २७ एक्स ०५७७ जात असताना संशयास्पद असल्याची शंका आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा, सुगंधी तंबाखू पदार्थ आढळून आल्याने हा माल व ट्रक पोलीस स्टेशनला आणून पंचनामा केला. यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी गुटखा एकूण किमत अंदाजे ८ लाख ९१ हजारांचा माल मिळून आला. यावरुन वाहनचालक शेख अयफाज शेख जाफर, रा.यास्मीन नगर, काटा रोड, अमरावती व क्लीनर शेख दानीश शेख इस्माईल, रा. रहेमान नगर, नागपुरी गेटच्या समोर अमरावती यांना अटक केली.
जप्त गुटखा माल असा
एकूण १५ लाख ९१ हजारांचा माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, पो.नि.आधारसिंग सोनोने, ठाणेदार वाशिम यांच्या मार्गदर्शनात बालाजी गव्हाणे, पाेलीस उपनिरीक्षक सारिका नारखेडे, तानाजी गव्हाणे, गायकवाड, पवार, जाधव, किल्लेकर, उगले यांच्या पथकाने केली आहे.
............................................
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता सुरु करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत २१ ऑगस्ट राेजी मालेगांव शहरातील शिवचौक येथे पाेलीस उपनिरीक्षक सारिका नारखडे व रात्रगस्तवरील कर्मचारी हे नाकाबंदी करीत असताना पहाटे ५ च्या सुमारास टेम्पो क्र. एम.एच. २७ एक्स ०५७७ जात असताना संशयास्पद असल्याची शंका आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा, सुगंधीत तंबाखू पदार्थ आढळून आल्याने हा माल व ट्रक पोलीस स्टेशनला आणून पंचनामा केला. यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी गुटखा एकूण किमत अंदाजे ८ लाख ९१ हजारांचा माल मिळून आला. यावरुन वाहनचालक शेख अयफाज शेख जाफर , रा.यास्मीन नगर, काटा रोड, अमरावती व क्लीनर शेख दानीश शेख इस्माईल, रा. रहेमान नगर, नागपुरी गेटच्या समोर अमरावती यांना अटक केली.
जप्त गुटखा माल असा
एकूण १५ लाख ९१ हजारांचा माल जप्त करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, पो.नि.आधारसिंग सोनोने, ठाणेदार वाशिम यांच्या मार्गदर्शनात बालाजी गव्हाणे, पाेलीस उपनिरीक्षक सारिका नारखेडे, तानाजी गव्हाणे, गायकवाड, पवार, जाधव, किल्लेकर, उगले यांच्या पथकाने केली आहे.