या प्रशिक्षणासाठी उद्घाटक म्हणून सरपंच ज्ञानेश्वर इडोळे यांची, तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे तसेच विषय विशेषज्ज्ञ कृषी अर्थशास्त्र डी. एन. इंगोले यांची उपस्थिती होती. तांत्रिक सत्रात राजेश डवरे यांनी संत्रावर्गीय पिकांवरील विविध किडींची ओळख, जीवनचक्र, नुकसानीचा प्रकार यावर प्रकाश टाकला तसेच संत्रा पिकावरील किडींच्या एकात्मिक व्यवस्थापन योजनेअंतर्गत विविध वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर, पिवळे चिकट सापळे यांचा वापर, संत्रा पिकावरील फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाकरिता आमिषाचा वापर, कीडीकरिता लेबल क्लेम शिफारशीत कीटकनाशकाचा वापर याविषयीसुद्धा विवेचन केले.
---------
कृषी अर्थशास्त्राच्या नोंदीबाबत मार्गदर्शन
अडोळी येथील कार्यक्रमात डी. एन. इंगोले यांनी कृषी व्यवसायात अर्थशास्त्राच्या नोंदी कशा कराव्या, तसेच उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याप्रकारचे नियोजन असावे, याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणासाठी आडोळी येथील शेतकरी बंधूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.