कारंजा येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. काळे, तर उद्घाटक म्हणून कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती डॉ. अशोक पाटील मुंदे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी रसायन व मृदशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉ. एच. डी. जाधव, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अशोक आगे यांच्यासह माती परीक्षण प्रयोगशाळेचे प्रभारी सुधीर देशमुख तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी प्रेमानंद राऊत उपस्थित होते. डॉ. काळे यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेती माध्यमातून मृद आरोग्य सुदृढ करून शेतीचे उत्पन्न वाढविणे शक्य असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. अशोक पाटील मुंदे यांनी कृषी विद्यापीठ तसेच कृषी विज्ञान केंद्राने तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य हाती घेतले आहे या दृष्टीने शेतकरी बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. तांत्रिक सत्रात डॉ. अशोक आगे यांनी माती परीक्षणामुळे खर्चात २० ते ३० टक्के बचत होत असल्याचे सांगितले. डॉ. जाधव यांनी जमीन आरोग्य व्यवस्थापन या विषयातील संतुलित खतांचा वापर, सेंद्रिय खते, पिकांची फेरपालटाचे फायदे, जैविक व हिरवळीच्या खतांचा वापर संवर्धित शेती व कमी मशागत पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी विभागाचे प्रतिनिधी प्रेमानंद राऊत यांनी कृषी विभाग नॅडेप पद्धतीने खत तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करत असल्याचे सांगितले. यशस्वितेसाठी राजेंद्र कोठाळे, दत्ता काळे, जगन देशमुख व माती परीक्षण प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन गंगाधर काळे, तर आभार एस. के. देशमुख यांनी मानले.
मृदा आरोग्य व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST