शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भुईमुगाची आवक वाढली; भाव घसरले!

By admin | Updated: May 29, 2017 01:18 IST

जिल्ह्यातील चित्र : खरिपाच्या तोंडावर शेतकरी सुलतानी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात असून, यंदा या पिकाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याने बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे दिसत आहे. तथापि, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या वाणालाही खूप कमी भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. यंदा जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाचा पेरा दुप्पट झाला होता. गतवर्षी ३ हजार ३७४ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. ते प्रमाण यंदा ६ हजार हेक्टरच्यावर गेले होते. त्यातच पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांना या पिकाचे एकराला सरासरी पाच क्विंटल उत्पादन झाले. त्यामुळे तूर आणि सोयाबीनमध्ये फटका खाणारे शेतकरी उत्साही होते; परंतु त्या उत्साहावरही बाजार व्यवस्थेने विरजण घातले आहे. मागील वर्षी प्रति क्विंटल ५ हजार ८०० रुपयांपर्यंत विकला जाणारा भुईमूग यंदा कमाल ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी ३ हजार ९०० रुपये क्विंटलने घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे निराश झाले आहेत. दरम्यान, खरिपाचा हंगाम तोंडावर आला असल्याने या हंगामासाठी हाती पैसा असावा म्हणून शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने घरात साठवलेले धान्य विकण्याची तयारी केली असून, नुकत्याच काढलेल्या भुईमुगाची विक्रीही करण्याची घाई त्यांना झाली आहे. त्यामुळे बाजारात भुईमुगाची आवक वाढली आहे. एकट्या कारंजा येथील बाजार समितीमध्ये २६ मे रोजी तब्बल पाच हजार क्विंटल भुईमुगाची आवक झाली होती. वाशिम, मंगरुळपीर, रिसोड आणि मालेगावातही भुईमुगाची विक्रमी आवक होत आहे.