शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शहरात चार ठिकाणी होणार ‘ग्रीन झोन’

By admin | Updated: June 13, 2017 00:50 IST

पहिल्या टप्प्यात ९७ लक्ष रुपयांची निघणार निविदा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहराला हिरवा शालू पांघरण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले असून, पहिल्या टप्प्यात शहरात चार ठिकाणी ‘ग्रीन झोन’ तयार केले जाणार आहेत. त्यासाठी ९७ लक्ष रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होण्यासोबतच तापमानात वाढ झाली आहे. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून संपूर्ण शहरात ‘ग्रीन झोन’ तयार करण्याची गरज आहे. शहरातील वाढते नागरिकीकरण वृक्षांच्या मुळावर उठले आहे. नागरिकांकडून बेसुमार वृक्षतोड होत असतानाच दुसरीकडे वृक्ष लागवडीसाठी ठोस प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे. जीवाची लाही करणाऱ्या गर्मीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शहरात वृक्ष लागवड करणे हाच एकमेव उपाय असून, त्या दिशेने मनपा प्रशासनाने पावले उचलली आहेत. ‘अमृत’योजनेंतर्गत शहरात विविध ठिकाणी वृक्षलागवड करून ‘ग्रीन झोन’तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यासाठी चार कोटी रुपये निधीची तरतूद केली असून, पहिल्या टप्प्यात २०१५-१६ करिता शहरात चार ठिकाणी ‘ग्रीन झोन’ तयार करण्यासाठी ९७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीने २०१५-१६ करिता प्रकल्प अहवाल तयार केला असता त्यामध्ये शहरातील चार जागांचा समावेश करण्यात आला. त्या ठिकाणी वृक्ष लागवड करणे, हिरवळ निर्माण करून मोठ्या वृक्षांसह शोभिवंत झाडांची लागवड करण्याचा समावेश आहे. याकरिता लवकरच प्रशासन निविदा प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती आहे. ‘धु्रव’ने तयार केला प्रकल्प अहवाल‘ग्रीन झोन’च्या माध्यमातून शहरात वृक्ष लागवड होऊन नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुणे येथील ‘धु्रव’नामक एजन्सीकडे सोपविण्यात आले. सदर एजन्सीची थेट शासन स्तरावरून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. शहरातील उद्याने, बगिच्यांसह मोठे क्षेत्रफळ असणाऱ्या शहरातील ओपन स्पेस, शासकीय जागांवर वृक्ष लागवड केली जाणार आहे. या जागांचा आहे समावेशप्रभाग क्रमांक १५ अंतर्गत येणाऱ्या गोरक्षण रोड भागातील व्हीएचबी कॉलनी येथील जलकुंभाचा परिसर, आदर्श कॉलनीस्थित मनपाच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक १६ चे मैदान, नायगाव येथील क ब्रस्तान परिसर, मोहता मिल परिसरातील कब्रस्तान परिसराचा समावेश आहे. --