शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन आर्मी’ ठेवणार वृक्षतोडीवर ‘वॉच’!

By admin | Updated: March 12, 2017 01:58 IST

३.५ हजार सक्रिय सदस्य; वन विभागाचीही वृक्षमाफीयांवर करडी नजर.

सुनील काकडे वाशिम, दि. ११- शासन स्तरावरून एकीकडे वृक्ष लागवड, संवर्धनावर विशेष भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र काही समाजविघातक प्रवृत्तींकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. त्यातही होळी या सणासाठी विशेषत: मोठमोठी वृक्ष तोडली जातात. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी यंदा ह्यग्रीन आर्मीह्ण अर्थात हरित सेनेचे तब्बल ३.५ हजार सदस्य सक्रिय राहणार आहेत. याशिवाय होळीपासून सलग तीन दिवस सकाळी ६ वाजेपासून वन विभागाचीही विशेष गस्त राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम जिल्ह्यात वाशिम-रिसोड, मेडशी-मालेगाव आणि कारंजा-मानोरा असे तीन वनपरिक्षेत्र असून, २४ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र वनाच्छादित आहे. वनांचा हा परिसर सागवानसह विविध वृक्षांनी व्यापलेला आहे. दरम्यान, वनांमधील वृक्षतोडीवर नियंत्रण मिळवून वृक्षसंवर्धन, संगोपन व्हायला हवे. यासह वृक्षलागवडीवर विशेष भर देण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने संयुक्त प्रयत्न चालविले असून, त्यात बहुतांशी यशदेखील मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणून होळी या सणाच्या औचित्यावर, मोठमोठय़ा वृक्षांच्या होणार्‍या बेसुमार कत्तलीवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासकीय पातळीवरून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ह्यमहाराष्ट्र हरित सेनाह्ण या अंतर्गत जिल्ह्यातील तीनही वन परिक्षेत्रांतर्गत सुमारे ३.५ हजार ह्यग्रीन आर्मी मेंबर्सह्णची ह्यऑनलाइनह्ण नोंदणी करण्यात आली आहे. हे सर्व सदस्य वृक्षतोडीवर नियंत्रण मिळविण्याकामी सक्रिय असणार आहेत. याशिवाय तीनही वनपरिक्षेत्रात होळीच्या दिवसापासून पुढे तीन दिवस सकाळपासून रात्री उशिरापर्यंंत वन विभागाच्या दोन चमू गस्तीवर राहणार आहेत. याशिवाय वन विभागाने वृक्षमाफीयांच्या मुसक्या आवळण्याकरिता १९२६ हा टोल फ्री क्रमांक जारी केला असून, वृक्षतोड अथवा वनांमध्ये शिकारीचे प्रकार घडत असतील तर नमूद क्रमांकावर संपर्क साधल्यास घटनांवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.शासनाच्या दिशानिर्देशानुसार गतवर्षीच्या जुलै महिन्यात जिल्ह्यात २.२२ लाख वृक्ष लागवड झाली. यापुढेही तीन वर्षांंत किमान ५ ते ६ लाख वृक्ष लागवडीचे नियोजन आहे. या वृक्षांसोबतच जंगलातील मोठमोठय़ा वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, वनपरिक्षेत्रात होळीच्या दिवसापासून पुढे सलग तीन दिवस दोन चमू सकाळपासून रात्री उशिरापर्यंंत वृक्षतोडीवर नियंत्रणासाठी गस्त घालणार आहेत.- एस.आर.नांदुरकर, वन परिक्षेत्राधिकारी, वाशिम.