शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई

By admin | Updated: May 16, 2017 18:28 IST

मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव, पांचयत समिती गणातील गावामध्ये भिषण पाणी टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव, पांचयत समिती गणातील रणजीत नगर, पाळोदी, ढेोणी, शेंदुरजना अढाव, उज्वलनगर, आदि गावामध्ये भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत आहे. शेंदुरजना पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे शासनव प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. शेंदुरजना अढाव पं.स.गणातील ही पाच ते सहा गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. त्यामुळे भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे. या परिसरात बोअरवेलसारखी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गेल्या १४ ते १५ वर्षापुर्वी उज्वलनगर भागातील टेकडी शिवारात तलावाचे कामाला सुरुवात झाली,मात्र अद्यापही त्या तलावाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे फेबु्रवारीपासूनच या डोंगराळ भागामध्ये तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. एका महिन्यापूर्वी उज्वलनगर येथील नागरिकाना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. तेव्हा तहसीलदार शेख गावामध्ये पाणी टंचाई पाहणीला गेले असता त्यांना ग्रामस्थांनी घेराव घालुन पाणी समस्या निकाली काढण्याबाबत मागणी केली होती. तेव्हा प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करुन देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे समजते. या गावात प्रत्येक वर्षी भिषण पाणी टंचाई भासते . तरी सुध्दा शासन व प्रशासन कायमस्वरुपी पाणी टंचाई समस्या निवारण करण्याकरिता दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाणयासाठी रानोमाळ वणवण भटकंती करण्याची वेळ आलेली आहे.   गेल्या १५ ते २० वर्षापासून उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. प्रशासन अखेरच्या महिन्यात तात्पुरती पाण्याची उपाय योजना करुन देण्यात धन्यता मानते. फेबु्रवारीपासून दरवर्षी भिषण पाणी टंचाई उदभवते. पाणी टंचाई समस्येमुळे ग्रामस्थांचा वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे मजुरी बुडते. परिणामी, पाणी टंचाईने अनेक ग्रामस्थ कुटूंबासह पुणे, मुंबई, सुरत आदि ठिकाणी कामाला जावुन उदरनिर्वाह करतात.त्यामुळे शासनाने कायम स्वरुपी पाणी टंचाई दुर करण्याकरिता उपाय योजना करावी.-रेखाताई नथ्थु पडवालपं.स.सदस्या