शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीच्या परिसराला विविध समस्यांचा विळखा

By admin | Updated: August 10, 2014 23:01 IST

सोयीसुविधांचा अभाव : कुंपणासह सौंदर्यीकरण आवश्यक

मंगरुळपीर: शहरातील गवळीपुरा भागाला लागून कृषी उत्पन्न बाजार समितीच्याजवळ असलेल्या हिंदू स्मशानभूमीचा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडल्यामुळे परिसराला कुंपण लावून येथे सौंदर्यीकरण करणे गरजेचे झाले आहे. स्मशानभूमीत हातपंप बसविण्याची मागणीही होत आहे. मंगरू ळपीर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्याजवळ महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामागील भागात गवळीपुरा परिसराला लागून हिंदू स्मशानभूमी आहे. या परिसरालगतच एक उर्दू शाळा आणि जिल्हा परिषदेकडून नगर परिषदेच्या अख्त्ययारीत देण्यात आलेली प्राथमिक मराठी शाळाही आहे. असे असतानाही परिसरातील काही व्यक्ती खासगी कामांसाठी या जागेचा वापर करीत असल्यामुळे परिसरात घाण, कचर्‍याचे साम्राज्य पसरत आहे. स्मशानभूमीत दहनविधीसाठी ओटा आणि शेडही उभारण्यात आले आहे; परंतु त्याची उंची पाहता त्या शेडचा क ाहीच फायदा असल्याचे दिसत नाही. पावसाळय़ाच्या दिवसात जवळपासच्या भागात पाणी साचल्यामुळेही अंत्ययात्रेत सहभागी व्यक्तींना चिखल तुडवत जावे लागते. त्याशिवाय जवळपास राहणारे लोक या परिसरात प्रात:विधी उरकत असल्यामुळे सर्वत्र घाण होत असून, अंत्यविधीमधील लोकांना चिखल आणि घाणीतच उभे राहावे लागते. नगर परिषदेने गावातील घन कचरा टाकण्याठी जागा सोडली असतानाही न.प.चे सफाई कामगार काही ृदिवसांपासून स्मशानभूमीमधील शेडजवळच कचरा टाकत असल्यामुळे येथे कचर्‍यांचे ढिगही तयार झाले आहेत. स्मशानभूमीत हातपंपही नसल्यामुळे हिंदू रितीरिवाजानुसार अंतिम संस्कार करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. गत काही वर्षांपूर्वी नगर परिषदेने स्मशानभूमी परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हातपंप बसविला होता; परंतु थोड्याच दिवसांत कु प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्याची मोडतोड केली. त्यानंतर पुन्हा एकदा नगर परिषदेकडून या ठिकाणी हातपंप बसविण्यात आला; परंतु त्या हातपंपाचीही मोडतोड करण्यात आली. त्यानंतर मात्र आजवर येथे हातपंप बसविण्यात आलेला नाही. स्मशानभूमीच्या परिसरात एकही वृक्ष नसल्यामुळे उन्हाळय़ाच्या दिवसांत अंत्यविधीसाठी येणार्‍यांना रखरखत्या उन्हात बसावे लागते. प्रशासनाने वरील समस्या लक्षात घेऊन स्मशानभूमी परिसराला किमान तार कुंपण लावून विविध सोयीसुविधा उपलब्ध करण्यासह सौंदर्यीकरणाचे काम तात्काळ सुरू करणे आवश्यक झाले आहे.