शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

निराधार लाभार्थींना तीन महिन्यांनंतर अनुदान !

By admin | Updated: July 1, 2017 01:03 IST

केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधी: तालुकास्तर कार्यालयांकडे दोन दिवसांत होणार प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :केंद्र सरकार पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना तीन महिन्यांनंतर अनुदान मिळणार असून, या लाभार्थींना वितरित करण्यासाठी २ कोटी रुपयांहून अधिक निधी जिल्हास्तरावर प्राप्त झाला आहे. येत्या दोन दिवसांत हा निधी तालुक ास्तरावर वितरीत करण्यात येणार आहे. जून ते सप्टेंबर २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीचे आर्थिक अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने हा निधी मंजूर केला आहे. वाशिम जिल्ह्यातील १९ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.शासनाच्या विविध अर्थ सहाय्यित योजनांच्या लाभार्थींना मागील मार्च महिन्यापासून अनुदान प्राप्त झाले नाही. यासाठी शासनाकडून निधीची तरतूदच होत नसल्याने राज्यातील लाखो निराधारांची चांगलीच परवड होत आहे. शासनाचे अनुदान आले असेल, या आशेने वृद्ध निराधार आणि विकलांग लाभार्थी वेळोवेळी बँकांत जाऊन चौकशी करतात. त्यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीमुळे ते निराश होऊन परतात. ही वस्तूस्थिती मागील ३ महिन्यांपासून पाहायला मिळत आहे. आता केंद्र पुरस्कृत योजनांमधील लाभार्थींच्या अनुदानासाठी जून ते सप्टेंबर २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीसाठी निधी प्राप्त झाला आहे. वाशिम जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे १९ हजार ४८० लाभार्थी आहेत. त्याशिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतने योजनेचे ४४०, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन योजनेचे ५३ लाभार्थी आहेत. आता शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील तिन्ही योजनांमधील मिळून एकूण १९ हजार ९७३ लाभार्थींना दिलासा मिळणार आहे. मे-एप्रिल महिन्याचे अनुदान प्रलंबितचकेंद्र पुरस्कृत अर्थ सहाय्य योजनेच्या लाभार्थींंना जून ते सप्टेंबर २०१७ या चार महिन्यांच्या कालावधीचे आर्थिक अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने हा निधी मंजूर केला आहे. अर्थात जून पासून पुढे सप्टेंबरच्या पुढील तीन महिन्यांचे अनुदान या योजनांच्या लाभार्थींना मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. तथापि, या योजनांच्या लाभार्थीचे अनुदान मार्चपासून प्रलंबित आहे. आता जूनइ महिना संपत आला असल्याने पूर्वीच्या अर्थात मार्चपासून जून पर्यंतच्या तीन महिन्यांचे अनुदान मिळणे आवश्यक होते; परंतु शासनाने मार्च, एप्रिल हे दोन महिने वगळून अनुदान मंजूर केल्यामुळे गोंधळच निर्माण झाला आहे.