शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामसेवक सरसावले 

By admin | Updated: April 29, 2017 19:12 IST

तालुका दुष्काळमुक्त करण्याचा ध्यास गावकरी आणि पदाधिकाºयांना लागला असताना आता ग्रामसेवक संघटनाही जलसंधारणाच्या कामांसाठी सरसावली आहे.

कारंजा लाड : लोकसहभागातून तालुका दुष्काळमुक्त करण्याचा ध्यास गावकरी आणि पदाधिकाऱ्यांना लागला असताना आता ग्रामसेवक संघटनाही जलसंधारणाच्या कामांसाठी सरसावली आहे. जयपूर येथे २९ एप्रिल रोजी कारंजा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामसेवक संघटनेने श्रमदानातून तीन एलबीएसची कामे गावकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केली. फांउडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेदरम्यान गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हा गावक-यांचा उत्साह वाढविण्यासाठी कारंजा पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी व ग्रामसवेक मंडळीनी २९ एप्रिल रोजी जयपुर गावक-यांच्या मदतीने गावातील नाल्यावर पाणी व माती साठविण्याची क्षमता असलेल्याा एल.बी.एस.ची अर्थात दगडी बांधाची निर्मिती श्रमदानातून करण्यात आली.गावातील चिमुकलेही लावताहेत वडिलधाऱ्या मंडळीला हातभारपाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वॉटर स्पर्धेमध्ये कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेदरम्यान गावकरी मोठया उत्साहाने सकाळी व रात्री श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना बालकांनीही यात सहभाग नोंदविण्यास सुरूवात केली आहे. जयपूर येथे २९ एप्रिल रोजी ग्रामसेवक संघटना आणि गावकरी एलबीएसच्या कामाला भिडले असताना गावातील लहान लहान बालकांंनीही आपली चमू तयार करून वानरसेनेप्रमाणे एलबीएसच्या कामांसाठी श्रमदान करुन मोठा हातभार लावला. बालगोपालांनी उन्हातही जलसंधारणाच्या कामात गावकऱ्यांना सहकार्य केले. बालगोपाल जलसंधारणाच्या कामात सहकार्य करीत असल्याचे पाहून वडिलधारी मंडळी भारावली.