शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवड मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान!

By admin | Updated: May 16, 2017 20:09 IST

वाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवून गावाच्या लोकसंख्येइतकी वृक्ष लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला सन्मान केला जाईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी केली. वृक्षलागवड उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वाशिम जिल्ह्याला ५ लक्ष ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यानुषंगाने ५ लक्ष २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत २ लक्ष ८३ हजार ५६५ खड्डे खोदण्यात आले आहेत. या सर्व खड्ड्यांचे जीपीएस मॅपिंग करण्यात येणार आहे. उर्वरित खड्डे ३१ मे २०१७ पर्यंत खोदून पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाप्रमुखांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड मोहिमेत विशेष उत्साह दाखवून ही मोहिम यशस्वी करावी. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन्मानित केले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.