शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत गैरप्रकारप्रकरणी आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:14 IST

राजूरा : येथील ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामपंचायत कामकाजात गैरप्रकार व अनियमिता झाल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्यापही कुठलीच कारवाई न झाल्याने येत्या १४ ऑगस्ट पर्यंत सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राजुरा येथील मनिष दत्तराव मोहळे यांनी ८ ऑगस्ट रोजी संबंधितांना निवेदनाद्वारे दिला आहे.  

ठळक मुद्देअधिकार्‍यांना निवेदन१४ ऑगस्टपर्यंत चौकशीची तक्रारकर्त्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क राजूरा : येथील ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच व सचिवांनी ग्रामपंचायत कामकाजात गैरप्रकार व अनियमिता झाल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्यापही कुठलीच कारवाई न झाल्याने येत्या १४ ऑगस्ट पर्यंत सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राजुरा येथील मनिष दत्तराव मोहळे यांनी ८ ऑगस्ट रोजी संबंधितांना निवेदनाद्वारे दिला आहे.  मनिष मोहळे यांनी ६ एप्रिल २0१५ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांच्यासह वरिष्ठाकडे नमुद तक्रारीत राजुरा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच व सचिवांनी जनतेची दिशाभूल करुन खोट्या स्वाक्षरीद्वारे बनावट ठराव पारित करुन नजीकच्या पिंपळवाडी येथील ग्रामस्थांना अतिक्रमणीत वनजमीनीचा नाहरकतीचा ठराव देण्यात आला,  तर तंटामुक्त गाव समितीच्या प्राप्त  निधीतून  खरेदी करण्यात आलेल्या सौरउर्जा दिवे खरेदीतही गैरप्रकार केल्याचे म्हटले आहे. शिवाय ग्रामपंचायतीच्यावतीने वसुल करण्यात आलेल्या घरकर, कोंडवाडा, अनामत जमा खर्चाच्या व्यवहारातही मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार करण्यात आल्याचे नमुद आहे. याशिवाय इतर कामकाजातही  अनियमितता  असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी विरु ध्द कारवाई करण्याची मागणी मनिष मोहळे यांनी ६ एप्रिल २0१५ रोजी संबंधीतांकडे केली होती. त्यानंतर सदर प्रकरणाची मालेगाव पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्‍यांकडून चौकशी करुन चौकशी अहवाल तक्रारकर्त्यासह वरिष्ठांकडे सादर सुध्दा करण्यात आला होता.चौकशीअंती तत्कालीन  सरपंच व सचिवांनी ग्रामसभेचा कोरमपूर्ण नसतानाही नियमबाह्य ठराव पारित करीत बरेच कामात अनियमितता केल्याचे आढळुन आले होते. मात्र दोन वर्षांतही वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप मनिष मोहळे यांनी केला आहे. सदर प्रकरणात वारंवार लेखी निवेदन, स्मरण पत्राव्दारे अनेकदा मागणी केली मात्र काहीच झाले नाही.  अखेर न्यायासाठी आंदोलनाचा पावित्रा मनिष मोहळे यांनी घेत, येत्या १४ ऑगस्टपर्यंंत सदर प्रकरणात कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, या संदर्भात मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महागावकर यांच्याकडून माहिती घेतली असता राजुरा ग्रामपंचायतीलमधील या गैरप्रकाराची  तक्रार ही आपल्या कार्यकाळातील नाही. ती आपण रुजू होण्यापूर्वीची ुअसल्यामुळे याबाबत विस्तार अधिकार्‍यांकडून सवीस्तर मीिती घेऊन कारवाईची दिशा ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.