शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

ग्रामपंचायतीची वीजजोडणी अखेर तोडली

By admin | Updated: August 12, 2015 00:41 IST

अनसिंग येथे दिवसभर कारवाई; दंड वसुलीकडे आता लक्ष.

अनसिंग (जि. वाशिम) : अनसिंग ग्रामपंचायतचा वीजचोरीचा गोरखधंदा लोकमतने १0 ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणताच, ग्रामपंचायत प्रशासन आणि वीज वितरण कंपनी शाखा अनसिंग व वाशिमच्या तंबूत एकच खळबळ उडाली. कर्तव्याला जागत अखेर वीज वितरण कंपनी शाखा अनसिंगने ११ ऑगस्टपासून अवैध वीजजोडणी तोडण्याला सुरूवात केली आहे. वीज गळती व वीज चोरी थांबविण्यासाठी वीज वितरण कंपनीतर्फे कारवाईची धडक मोहिम सुरू असतानाच, अनसिंग येथे मात्र वीज वितरण कंपनीच्या जबाबदार अधिकार्‍यांच्या मूकसंमतीने ग्रामपंचायत प्रशासनानेच वीजचोरीचा गोरखधंदा गत एका महिन्यापासून सुरू केला होता. वीज वाहिणीच्या तारावर आकोडे टाकून पथदिव्यांना अवैध वीजजोडणी घेतली होती. ग्रामपंचायत प्रशासनाचा वीजचोरीचा हा गोरखधंदा ह्यलोकमतह्णने उजागर करताच ११ ऑगस्टला सकाळी ८ वाजतापासून स्थानिक श्रृंगऋषी कॉलनीतील वीज खांबाजवळ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी हजर झाले. या कॉलनीतील जवळपास आठ खांबावरील आकोडे काढून अवैध वीजजोडणी तोडण्यात आली. वाशिम जिल्ह्यात वीजचोरीप्रकरणी यापूर्वी वीज वितरण कंपनीने सर्वसामान्य नागरिकांविरूद्ध दंड वसूली आणि विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. आता शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील शेवटचा घटक असलेल्या ग्रामपंचायतविरूद्ध वीज वितरण कंपनी वीजचोरीप्रकरणी किती दंड वसूल करते आणि संबंधितांविरूद्ध कोणता गुन्हा दाखल करते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.