शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींची ३८ टक्के कर वसुली !

By admin | Updated: March 17, 2016 02:26 IST

अल्प कर वसुलीमुळे ग्रामविकासात खीळ; कर वसुलीची विशेष मोहीम गतिमान करण्याची गरज.

संतोष वानखडे / वाशिमविविध प्रकारच्या कर वसुलीतून ग्राम पंचायत स्तरावर विकासात्मक कामे केली जातात; मात्र ग्राम पंचायतींच्या कर वसुलीचे सरासरी प्रमाण केवळ ३८ टक्के असल्याने विकासात्मक कामांना खीळ बसत आहे.ग्राम पंचायतच्या मालमत्ता व पाणी कराची १00 टक्के वसुली ३१ मार्च २0१६ पूर्वी करण्याची बाब शासनाने गांभीर्याने घेतली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषद प्रशासनाने कर वसुलीच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या आहेत. कर वसुलीसाठी २८ ते ३१ मार्चदरम्यान विशेष मोहिमेचे नियोजन केले आहे. सन २0१५-१६ या वर्षात वाशिम जिल्ह्यातून सर्व ग्रामपंचायतींनी २ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपयांचा थकित घर व पाणी कर वसूल करणे अपेक्षित आहे. जानेवारी २0१६ अखेर १ कोटी २ लाख ७४ हजार रुपयांचा कर वसूल केला असून, याची टक्केवारी ३७.५५ अशी आहे. फेब्रुवारी महिन्याचा अहवाल येणे बाकी आहे. वाशिम पंचायत समितींतर्गत येणार्‍या ग्रामपंचायतींनी १९.९९ लाख रुपयांचा थकीत घर व पाणी कर वसूल करणे अपेक्षित आहे. जानेवारी २0१६ अखेर १0.१७ लाखांचा कर वसूल केला असून, याची टक्केवारी ५0.८८ अशी आहे. रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ११९.३७ लाख रुपयांचा थकीत घर व पाणी कर वसूल करणे अपेक्षित आहे. जानेवारी २0१६ अखेर ४५.३६ लाखांचा कर वसूल केला असून, याची टक्केवारी ३८ अशी आहे. मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ४९.४८ लाख रुपयांचा थकीत घर व पाणी कर वसूल करणे अपेक्षित आहे. जानेवारी २0१६ अखेर १७.३१ लाखांचा कर वसूल केला असून, याची टक्केवारी ३५ अशी आहे. ३१ मार्च २0१६ पर्यंत कर वसुलीचा ६0 टक्क्याचा आकडा गाठला जातो की नाही? यावर संबंधित यंत्रणेचे यशापयश अवलंबून राहील.