शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ग्राम पंचायतींना जमा-खर्चाच्या हिशोबाचा विसर!

By admin | Updated: June 2, 2014 01:10 IST

वाशिम तालुक्यातील प्रकार गैरप्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

वाशिम : ग्रामसभेत मतदारांना जमा-खर्चाचा हिशोब दिला तर आपले खरे चेहरे समोर येण्याच्या भीतीपोटी वाशिम तालुक्यातील जवळपास ६0 ग्रामपंचायतींनी मतदारांना प्रत्यक्ष हिशोबच दिला नसल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामविकास मंत्रालयाचे आदेश खाटल्यावर घालत मुजोर ग्रामपंचायतींनी दरवर्षीचाच कित्ता यावर्षीही गिरवित आपल्या गैरप्रकारावर पडदा टाकण्याचा केविलवाना प्रयत्न चालविला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गावाच्या सर्वांगीन विकासासाठी आलेला निधी योग्य ठिकाणीच खर्च होण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत प्रशासनाने एका वर्षातील जमा-खर्चाचा हिशोब आर्थिक वर्षातील एप्रिल किंवा मे महिन्यातील पहिल्या ग्रामसभेत गावकर्‍यांना द्यावा, असे राज्य शासनाचे आदेश आहेत. ग्रामसभेत मतदारांना हिशोब दिला तर कामकाजात पारदर्शकता राहिल, शासकीय निधीच्या दुरुपयोगाला पायबंद बसेल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने सदर आदेश जारी केले आहेत. विविध मार्गाने आलेला निधी विकासात्मक बाबींवर खर्च न होता, तो संबंधितांच्या घरातच पद्धतशीरपणे मुरविला जात होता. वाशिम तालुक्यातील जवळपास ६0 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत जमा-खर्चाच्या हिशोबाचा प्रत्यक्ष पाढा वाचला नसल्याची थक्क करणारी माहिती आहे. १ एप्रिल २0१३ ते ३१ मार्च २0१४ या आर्थिक वर्षात विविध मार्गाने एकूण किती निधी आला आणि तो निधी कोणकोणत्या बाबींवर खर्च केला, किती निधी शिल्लक राहिला याबाबतचा संपूर्ण हिशोब ग्रामपंचायत प्रशासनाला एप्रिल किंवा मे २0१३ या महिन्यातील पहिल्या ग्रामसभेत मतदारांना देणे आवश्यक होते.